Join us

महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला मुंबईत सुट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:02 AM

खासदार- आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यासाठी ३ खासदार आणि ६ आमदारांची शिफारस असलेल्या पत्रासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. 

मुंबईकरांना गणेशोत्सव, गोकुळाष्टमीत देण्यात आलेल्या सुट्टीप्रमाणे मुंबईकरांनासुद्धा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी ३ खासदार, ६ आमदारांनी आपल्या शिफारस पत्रासह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महापरिनिर्वाण दिनी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, पूनम महाजन, राज्यमंत्री संजय बनसोड, काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, कालिदास कोळंबकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, प्रसाद लाड यांनी शिफारस पत्रासह मागणी केली आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई