होलिका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा, महावितरणाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 07:41 PM2018-02-27T19:41:11+5:302018-02-27T19:41:11+5:30

होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

Holika combustion, use of free space for smoke, appeal of Mahavitaran | होलिका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा, महावितरणाचे आवाहन

होलिका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा, महावितरणाचे आवाहन

Next

मुंबई- होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते.

याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या ह्या भूमिगत असल्याने त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकित अपघातास कारणीभूत ठरू शकते.

त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्या अथवा वीज यंत्रणा यांच्यापर्यंत उडणार नाही, याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेचे रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेच्या खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबा सभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळताना वीज मीटर, विजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने विजेच्या बटनांना स्पर्श करू नका. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

हे लक्षात ठेवा:-

• वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा
• होळी आणतांना तीचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये
• वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फ़ेकू नका
• ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका
• वीज खांबासभोवती पाण्याचा निचरा करू नका

Web Title: Holika combustion, use of free space for smoke, appeal of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी