आव्हांडांच्या घरचा पत्ता... चाळीतील खोली क्रमांक 6 ते महाराष्ट्राचे 'गृहनिर्माणमंत्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 10:55 AM2020-01-05T10:55:12+5:302020-01-05T10:56:24+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी खातेवाटपानंतर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका चाळीतून सुरू झालेला जितेंद्र आव्हाड यांचा प्रवास आज गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला केवळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यामुळेच इथपर्यंतची मजल गाठता आली, अशी भावनिक प्रतिक्रिया आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. ठाकरे सरकारच्या या मंत्रिमंडळात कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खात्याचे मंत्रीपद देण्यात आलंय. मंत्रिमंडळाचं खातेवाटप होताच, आव्हाड यांनी ट्विटरवरुन भावनिक अन् बोलकी प्रतिक्रिया दिली. लहानपणी एका चाळीतील एका खोलीत राहणार मुलगा आज राज्याचा गृहनिर्माण मंत्री बनल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, ही किमया करण्याचं काम फक्त आणि फक्त शरद पवार हेच करू शकतात, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांचे हे भावनिक ट्विट सर्वसामान्य कुटुंबाताली कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारं आहे. राजकारण हे सामान्य माणसांचं काम नाही, असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा प्रवास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आहे.
लहानपणीचा घरचा पत्ता -
चाळीचे नाव श्रीपत भवन,
खोली क्रमांक ६,
वाडिया स्ट्रीट,
ताडदेव.
मुंबई..
आणि आज चाळीचा विकास करणारं गृहनिर्माण मंत्री पद.
हि किमया फक्त आणि फक्त #शरद_पवार साहेबच करू शकतात.
#गृहनिर्माण_मंत्री
आव्हाड यांनी केलेंल ट्विट
लहानपणीचा घरचा पत्ता -
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2020
चाळीचे नाव श्रीपत भवन,
खोली क्रमांक ६,
वाडिया स्ट्रीट,
ताडदेव.
मुंबई..
आणि आज चाळीचा विकास करणार गृहनिर्माण मंत्री पद.
हि किमया फक्त आणि फक्त #शरद_पवार साहेबच करू शकतात. #गृहनिर्माण_मंत्री