८,२६२ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:50 PM2020-05-17T14:50:05+5:302020-05-17T14:50:39+5:30
१०,७९१ किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी ४,८६६ सुरू; राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : आज दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्य सेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर सेवन परवाने एका वर्षाकरिता १०० रुपये किंवा आजीवन परवान्याकरिता १००० रुपये एवढे शुल्क अदा करून मिळवू शकतात.
राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
15 मे रोजी राज्यात 119 गुन्हे नोंदविण्यात आले असून 63 आरोपींना अटक करण्यात आली असून 24 लाख 16 हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 24 मार्च पासुन 15 मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,608 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,520 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 565 वाहने जप्त करण्यात आली असून 15 कोटी 17 हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.