Join us

१५ मे पासून आतापर्यंत  ६ लाख ४ हजार ६८३   ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:16 PM

15 मे ते 30 मे  या काळात राज्यात 6 लाख 04 हजार 683 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.

 

मुंबई :  15 मे ते 30 मे  या काळात राज्यात 6 लाख 04 हजार 683 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. शनिवारी दिवसभरात 52 हजार 046  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 31 हजार 048 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आली, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहिती दिली. 

राज्यात 15 मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,187 अनुज्ञप्ती सुरू  आहेत. 1 मे  ते 29 मे  या काळात 1 लाख 14 हजार 224 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 02 हजार 712 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.  ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच आयओएस प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. ज्याला ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाइन पध्दतीने सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता 100 रुपये किंवा आजीवन परवान्याकरीता 1 हजार रुपये एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. अवैध मद्यविक्रीचे 29 मे रोजी राज्यात 125 गुन्हे नोंदविण्यात आले असून 57 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 16 लाख 72 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 24 मार्च ते 39 मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,791 गुन्हे नोंदविण्यात आले असून 3,146 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 644 वाहने जप्त करण्यात आली असून 17 कोटी 85 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस