Join us

शब-ए-बारातबद्दल गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:06 AM

रविवारी होणार साजरीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये ...

रविवारी होणार साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाच्यावतीने मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

येत्या २८ मार्चला रात्री शब ए बरात आहे. सर्व मुस्लीम बांधव आपआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविडच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी २८ मार्चची रात्र व २९ मार्चची पहाट या कालावधीत कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करणे उचित ठरेल. त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी. मशिदीत नमाज पठणाकरिता येणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टप्प्याटप्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व मास्कचा वापर करून दुवा पठण करावे. मशीद व आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर, इ.) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे या सूचनांत म्हटले आहे.