Join us

एमएमआरमध्ये गृहोद्योगांची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:58 PM

मुंबई-नाशिक महामार्ग एमएमआरवाढीचा कॉरिडॉर : लोढाचा अपर ठाणे प्रकल्प २०० एकरवर

मुंबई : बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये गृहखरेदीदारांचा रस वाढत आहे. मालाड, कांदिवली, नेरूळ, चेंबूर, मुलुंड, ठाणे यांसारख्या छोट्या बाजारपेठांमध्ये २०१८ मध्ये ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे अनेक नवे प्रकल्प सुरू झाले आहेत. घरखरेदी करू इच्छिणारे उपनगरांकडे वळत आहेत. ठाणे येथील छोट्या बाजारपेठेतील मागणी वाढली आहे. आगामी संरचनात्मक प्रकल्प, व्यावसायिक बांधकामे, दळणवळणातील सुधारणेचे प्रकल्प आणि ५ ते १५ हजार रुपये प्रति चौरस फूट किमतीतील प्रकल्पांची विस्तृत श्रेणी हे सर्व एकत्र येऊन याला उपनगराचा चेहरा देत आहेत.

लियासेस फोरास रिअल इस्टेट रेटिंग अ‍ॅण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या अहवालानुसार, ठाणे पश्चिम भागातील घरांच्या विक्रीने भारतभरातील छोट्या बाजारपेठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या १२ महिन्यांत ठाणे पश्चिम भागात सात हजार ७५५ घरांची विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही २१ टक्के वाढ आहे. गतवर्षी सहा हजार ४२७ घरांची विक्री झाली होती. मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाला सरकारने फास्ट ट्रॅक विभागात घातल्यानंतर वेग आला आहे. माणकोली-डोंबिवली जोडरस्ताही पूर्ण होत आहे. रांजनोली आणि माणकोली येथील उड्डाणपुलांची एक बाजू जनतेसाठी खुली केली आहे. तर दोन्ही उड्डाणपुलांच्या दुसरीकडील बाजूचे बांधकाम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी लोढा ग्रुपकडे एमएमआरमधील (मुंबई महानगर प्रदेश) व त्या पलीकडील वाढीचा पुढील कॉरिडॉर ओळखण्याची दृष्टी आहे. वाहतुकीच्या असंख्य आगामी सुविधा, मुंबई-नाशिक पट्ट्यातील संरचना प्रकल्प यामुळे लोढा ग्रुपने ‘अपर ठाणे’ हा प्रकल्प या भागाच्या केंद्रस्थानी सुरू केला आहे. १४ एकर हिरवाईसह २०० एकरहून अधिक जागेत पसरलेला अपर ठाणे सुधारित जीवनशैलीचा वायदा करणारा आहे. अलीकडील काळात या भागात अनेक प्रस्थापित विकासकांनी विविध विभागांतील दर्जेदार घरे ग्राहकांना देऊ केली आहेत. सुविधा आणि जीवनशैलीच्या पलीकडे गृहखरेदीदार त्यांच्या स्वप्नातील घरामध्ये गुंतवणूक करताना कनेक्टिव्हिटी, सोय, त्या भागातील संरचना, जवळपासचा परिसर, आकर्षक मूल्यविधान तसेच शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा, रिटेल व व्यावसायिक आस्थापने हे मुद्दे प्रामुख्याने विचारात घेतात. मोक्याच्या जागी असल्याने या भागात या सर्व मुद्द्यांचा परिपूर्ण मेळ आहे.उल्लेखनीय प्रकल्पच्मुंबई-नाशिक महामार्गाचे आठ पदरीकरणच्माणकोली-डोंबिवली जोडरस्ता आणि उल्हास नदीवरील पूलच्माणकोली आणि रांजनोली येथील उड्डाणपूलच्मुंबई मेट्रो लाइन-५च्मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गच्मुंबई इन-लँड जलमार्ग प्रकल्पच्विरार-अलिबाग बहुमार्गीय कॉरिडॉर