गृहकर्जाची उचल 23 टक्क्यांनी वाढली

By admin | Published: August 20, 2014 10:48 PM2014-08-20T22:48:00+5:302014-08-20T22:48:00+5:30

स्वप्नपूर्तीपोटी गृहकर्ज घेण्यासाठी देशातील विविध बँकांतून लोकांची गर्दी होत असल्याचे गृहकर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Home loan increased by 23% | गृहकर्जाची उचल 23 टक्क्यांनी वाढली

गृहकर्जाची उचल 23 टक्क्यांनी वाढली

Next
>मुंबई : साडे दहा ते पावणो अकरा टक्क्यांच्या दरम्यान गृहकर्जाचे व्याजदर पोहोचले असले तरी, घराच्या गरजेपोटी आणि स्वप्नपूर्तीपोटी गृहकर्ज घेण्यासाठी देशातील विविध बँकांतून लोकांची गर्दी होत असल्याचे गृहकर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या विविध बँकांनी केलेल्या गृहकर्ज वितरणात गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत तब्बल 23 टक्के वाढ झाली आहे.
या गावांतून गृहकर्ज प्रकाराला फारशी उचल नसल्याने गावांतून सादर होणारे प्रकल्प पाहता त्यातील गुंतवणुकीसाठी लोक पुढे येत आहेत आणि परिणामी ही वाढ दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या 23 टक्के वाढीपैकी तब्बल 7क् टक्के वाढ ही या नव्या प्रकारातून झालेली आहे. तर उर्वरित वाढ ही मेट्रो तसेच मोठय़ा शहरांतील प्रकल्पात लोकांनी घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाच्या रुपाने झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, या कालावधीत घरे घेणा:या लोकांपैकी सुमारे 6क्  लोक हे 15 ते 2क् लाख रुपये गृहकर्ज घेणारे आहेत. तर उर्वरित 4क् टक्क्यांपैकी 25 टक्के लोक हे 25 ते 5क् लाख रुपयांचे गृहकर्ज घेणारे लोक आहेत तर उर्वरित 15 टक्के लोकांनी 5क् लाख रुपये व त्यापुढे कर्ज घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते.
दरम्यान, आगामी काळात अर्थव्यवस्थेत सुधार अपेक्षित असून यामुळे व्याजदर कपातीला वाव आहे, तसेच, चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय वित्तमंत्र्यांनी गृहकर्जावरील वजावटीमध्येही 5क् हजार रुपयांची वाढ केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर कर्जाच्या उचलीमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.  (प्रतिनिधी)
 
4अर्थव्यवस्थेत दिसून येणारा सुधार किंवा अन्य तत्सम कारणांमुळे गृहकर्जात वाढ झालेली नसून, त्याची कारणो थोडी वेगळी आहेत. 
4उपलब्ध माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या धोरणात केलेल्या बदलामुळे गृहकर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे.
 
4व्याजदरात कपात झाल्यास केवळ गृहकजर्च नव्हे तर बांधकाम उद्योगालाही चालना मिळेल, असे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, वाढती वित्तीय तूट आणि चलनवाढीमुळे व्याजदरात कपात न करण्याची भूमिका भारतीय रिझव्र्ह बँकेने घेतली आहे.  
4या पाश्र्वभूमीवर आता बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या धोरणात बदल करत मेट्रो अथवा मोठय़ा शहरांच्या तुलनेत ज्या छोटय़ा गावांतून अथवा शहरांतून आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसत आहे, अशा शहरांतून नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे, तसेच तिथले दरही आकर्षक ठेवले आहेत.

Web Title: Home loan increased by 23%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.