गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:53+5:302021-07-25T04:06:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती लॉकडाऊनदरम्यान वाढल्याने आता बांधकाम क्षेत्रासमोर नवीन अडचणींमध्ये भर ...

Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true? | गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती लॉकडाऊनदरम्यान वाढल्याने आता बांधकाम क्षेत्रासमोर नवीन अडचणींमध्ये भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यातच आता महागाईची भर पडल्याने बांधकाम उद्योजकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

लोखंडी सळई, प्लास्टिक, रेसीन्स, इन्स्युलेशन सामान यांच्या किमतीत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे स्थावर मालमत्तेच्या किमतींवर मागील काही वर्षांत सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनाच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळावी तसेच ग्राहक आकर्षिले जावेत, यासाठी बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले. मात्र, तरीदेखील कच्च्या मालाच्या किमती या वाढतच आहेत.

कोरोनामुळे अत्यावश्यक कच्चा मालाच्या किमतीत आणखी झालेली वाढ व व्यापाऱ्यांकडील पुरवठ्यातील तूट या सर्व गोष्टी विकासकांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने पहिल्या लाटेनंतर सुरू झालेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गृहकर्ज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया - ६.७५ टक्के

पंजाब नॅशनल बँक - ७ टक्के

एचडीएफसी बँक - ६.८० टक्के

कोटक महिंद्रा बँक - ६.६५ टक्के

आयसीआयसीआय बँक - ६.७५ टक्के

बँक ऑफ बडोदा - ७ टक्के

एलआयसी फायनान्स - ७ टक्के

कॅनरा बँक - ६.९० टक्के

युनियन बँक - ६.९० टक्के

ॲक्सिस बँक - ७ टक्के

बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच

२०१८, २०१९, २०२०, २०२१

सिमेंट (प्रति बॅग) २००, २२०, २४०, २६०

विटा (प्रति नग) ७, ८, १०, १२

वाळू (प्रति टन) १५००, १६००, १८५०, २०००

खडी (प्रति ब्रास) २६००, २८००, २९५०, ३२००

स्टील (प्रति टन) ३६०००, ३८०००, ४००००, ४२०००

शहरापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

मुंबईत शहर व पूर्व-पश्चिम उपनगरात घरांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई शहर वगळता इतर ठिकाणी घरे तुलनेने स्वस्त आहेत. मात्र, तेथून कामाकरिता मुंबईत येण्यासाठी लोकल अथवा बस असे पर्याय आहेत. मात्र यामध्ये वेळ व पैसा खर्च होतो.

मागील काही महिन्यांत लोखंडाचे दर २० हजार रुपये प्रति टनाने वधारले आहेत. तसेच तांबे व ॲल्युमिनियमच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चावर परिणाम झाला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत घट होण्यासाठी विकासकांकडून सतत मागणी होत आहे. परंतु, सरकार या मागणीला गांभीर्याने घेत नाही. याचा परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पावर परिणाम होत आहे. तसेच कच्च्या मालाची तूट व त्यातून वाढणाऱ्या किमतींमुळे येत्या काळात बांधकाम क्षेत्रासमोरील समस्या वाढणार आहेत.

- सुमीत भगत (बांधकाम साहित्य विक्रेते)

घर घेणे कठीणच

संजय पोतदार - मुंबईत परवडणारे घर आता मिळेनासे झाले आहे. घरांच्या किमती आता करोडोंमध्ये आहेत. परवडणारे घर मिळण्यासाठी नवी मुंबई, ठाणे शोधाशोध करावी लागत आहे. त्यात आता बांधकाम साहित्य महाग झाल्याने काही प्रमाणात किमती वाढल्या आहेत. त्यामुळे घर घेणे कठीण झाले आहे.

Web Title: Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.