घराचं स्वप्न महागणार, सरकार स्टॅम्प ड्युटी वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 06:54 PM2018-11-27T18:54:51+5:302018-11-27T19:43:42+5:30

मुंबईत लवकरच घरांचे दर कडाडणार आहेत.

Home price will increase, government stamp duty will hike | घराचं स्वप्न महागणार, सरकार स्टॅम्प ड्युटी वाढवणार

घराचं स्वप्न महागणार, सरकार स्टॅम्प ड्युटी वाढवणार

Next

मुंबई- मुंबईत लवकरच घरांचे दर कडाडणार आहेत. कारण घर खरेदी करताना आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी वाढणार आहे. घर खरेदीची स्टॅम्प ड्युटी एक टक्क्यानं वाढणार असून, त्याचा भुर्दंड घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पडणार आहे. स्टॅम्प ड्युटी वाढविण्यासंदर्भातील विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्याची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मेट्रो, मोनो, जलद बस सेवांच्या विकासासाठी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त स्टॅम्प डय़ुटीचाही समावेश आहे. विधेयकामुळे स्टॅम्प ड्युटीत एक टक्का वाढ होणार आहे. मेट्रो, मोनो, जलद बस सेवांच्या विकासासाठी अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार आहे. मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी सहा टक्क्यांवरून आता सात टक्के होणार आहे. मालमत्तेच्या विक्री, दान आणि गहाण ठेवण्यासाठी देण्यात येणार्‍या स्टॅम्प ड्युटीत वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा घर खरेदी करताना खर्च वाढणार आहे.

Web Title: Home price will increase, government stamp duty will hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर