Join us

राज्य सरकारच्या नियमानुसारच बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांचे होम क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 6:04 AM

मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेता सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारीविनय तिवारी यांना मुंबई पालिकेने सक्तीने क्वारंटाइन केल्याची टीका होऊ लागली आहे. मात्र देशांतर्गत विमान प्रवास करणाºया व्यक्तीसाठी राज्यसरकारच्या नियमावलीनुसार होम क्वारंटाइन आवश्यक आहे. या अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबत तिवारी यांना कळविण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले.

बिहार राज्यातून आलेले पोलीस अधिकारी तिवारी हे गोरेगाव (पूर्व) येथील राज्य राखीव पोलीस बल ग्रुप ८ च्या विश्रामगृहात असल्याची माहिती पी दक्षिण विभागाला रविवारी मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने त्यांना कोविड-१९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार होम क्वारंटाइन करणे आवश्यक असल्याने पालिकेच्या पथकाने त्यांची भेट घेतली. तसेच होम क्वारंटाइनमधून सूट मिळण्यासाठी त्यांनीपालिकेच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे नियमावलीनुसार अर्ज करावा, असे त्यांना कळविण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.असा आहे नियमराज्य सरकारचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डीएमयू/ २०२०/सीआर ९२/डीएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाºया व्यक्तीसाठी नियमावली ठरवून दिली आहे. त्यामध्ये होम क्वारंटाइनचा समावेश आहे.भाजपची पालिका मुख्यालयात निदर्शनेभाजपच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या दालनाबाहेर निदर्शने करीत प्रशासनाचा निषेध केला.बिहारमधील अन्य अधिकारी मुंबईत येऊन फिरून गेले. मग एवढ्या गंभीर प्रकरणाच्या चौकशीस आलेल्या अधिकाºयाला वेगळा न्याय का? सुशांतसिंहने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे.अशा वेळी तपासासाठी बिहारचे वरिष्ठ अधिकारी आले असताना त्यांच्या तपासात अडथळे आणणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न भाजपने केला. पालिका आयुक्तांनी तिवारी यांना क्वारंटाइनमधून सूट द्यावी, अन्यथा मोठे आंदोलन करू, असा इशारा भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.

बिहार पोलिसांनी परवानगी घेतली नव्हती - मुख्यमंत्रीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्य मंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिहारचे पोलीस कोणतीही परवानगी न घेता महाराष्ट्रात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे योग्य आहे ते नियमानुसार करा असा सल्ला दिला. त्यानंतर बिहारमधून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना क्वॉरंनटाईन करण्यात आले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतउद्धव ठाकरेबिहार