Join us

परदेशातून आलेल्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्यास होम क्वारंटाइनची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 3:38 AM

आतापर्यंत परदेशातून येणाºया नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सक्तीचे होते.

मुंबई : परदेशात प्रवास करून येणाऱ्या व्यक्तीला आता दुसºयाच दिवशी आरटी-पीसीआर चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याची सूटही मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत हॉटेलमध्ये सक्तीने क्वारंटाइन व्हावे लागणाºया प्रवाशांना दिलासा मिळेल.

आतापर्यंत परदेशातून येणाºया नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सक्तीचे होते. त्यानुसार विमानतळ परिसरातील तसेच मुंबईतील अन्य तारांकित हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची सोय केली होती. मात्र परदेशातून आलेल्या नागरिकांना कोविड चाचणी आणि १४ दिवस हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च उचलावा लागत होता. पंचतारांकित हॉटेलचे शुल्क कमी करण्याचे आवाहनही पालिका प्रशासनाने केले होते. मात्र कामानिमित्त परदेशात गेलेल्या काही लोकांना हा खर्च परवडत नसला तरी त्यांना हा भुर्दंड सहन करावा लागत होता.परंतु, आता राज्य सरकारने परदेशी प्रवाशांसाठी आखलेल्या नियमावलीमध्ये सुधारणा केल्यानंतर पालिकेनेही यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार विमान प्रवासाच्या दोन दिवसांच्या कालावधीत संबंधित व्यक्तीने चाचणी करून त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांना होम क्वारंटाइन होता येईल. यासाठी त्यांना आपला अहवाल पाठवून संस्थात्मक विलगीकरणातून सूट मिळण्यासाठी कळवावे लागणार आहे.

टॅग्स :विमानतळकोरोना वायरस बातम्या