मुंबई: लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय गुरुवारी महाबळेश्वरला पोचल्याने एकाच खळबळ माजली होती. महाबळेश्वरला जाण्यासाठी त्यांना गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र परवानगी म्हणून मिळाल्याने आणखीच चर्चेला उधाण आले आहे. वाधवान कुटुंबियांचा हा सर्व प्रकार समोर आल्यांनतर अमिताभ गुप्ता यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हणाले की, वाधवान कुटुंबीयांना लॉकडाऊनमध्ये प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्याची माहिती देखील यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.
वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कार्स मधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला होता. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी त्यांना खंड्याहून महाबळेश्वरला जात आहेत. त्यांना तिथे पोहोचता यावं यासाठी सहकार्य करावं असं त्या पत्रात म्हटलं होतं. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात संचार बंदी सुरू असतानाच येस बॅक प्रकरणात बेलवर असणारे वाधवा बंधू कुटुंबीयांसमवेत 23 लोकांना VIP पास दिला गेला. मुंबईतून खंडाळा, महाबळेश्वर प्रवास यासाठी कार पास पत्र गृह विभाग सचिव विशेष अमिताभ गुप्ता यांनी दिला असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. बेलवर असणार वाधवान याना कसा प्रवास पास मिळतो यसंदर्भात चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे.