Join us

एका फोनवर घरपोच मिळणार औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 4:52 PM

फोर्टपासून पुढे विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या दुकानामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई - मुंबई लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांना-रुग्णांना औषधे मिळत नसल्याच्या, औषधांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत अखेर मुंबईकरांसाठी औषध विक्रते पुढे आले आहेत. त्यानुसार मुंबईत ५० ठिकाणांहून घरपोच औषधे पुरवण्याचा निर्णय या औषध विक्रेत्यांनी घेतला आहे. फोर्टपासून पुढे विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या दुकानामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रिटेल अँड डिस्पेन्सिग केमिस्ट असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांनी या 50 पैकी आपल्या जवळच्या औषध विक्रेत्याला फोन करत ई प्रिस्क्रिप्शन पाठवल्यानंतर त्यांना औषधे घरपोच नेऊन दिली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट ड्रजिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.

औषध मिळत नसल्याच्या, औषधांचा तुडवडा असल्याच्या संदेश किंवा वृतांमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच, पुढचे तीन महिने पुरतील इतका औषधांचा साठा मुंबईसह राज्यभर आहे. त्यामुळे रुग्णांनी चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. त्यामुळे सामान्यांनीही औषधांसाठी बाहेर जाणे टाळून घरीच सुरक्षित रहावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई