होमीओपॅथीमध्ये संशोधन होणे आवश्यक- अमित देशमुख; डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:14 AM2020-01-29T05:14:46+5:302020-01-29T05:14:59+5:30
मुंबई : राज्यात अशी अनेक गावे आहेत जेथे होमीओपॅथी डॉक्टर पोहोचले असून सेवाभावाने रुग्णांची सेवा करीत आहेत. होमीओपॅथीची जपणूक ...
मुंबई : राज्यात अशी अनेक गावे आहेत जेथे होमीओपॅथी डॉक्टर पोहोचले असून सेवाभावाने रुग्णांची सेवा करीत आहेत. होमीओपॅथीची जपणूक होणेही आवश्यक आहे. आज होमीओपॅथीचा अभ्यास अनेक विद्यार्थी करतात. भविष्यात विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबतच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवाव्यात. विद्यार्थ्यांनी होमीओपॅथीमध्ये संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे.
याचा रुग्णांना आणि या क्षेत्रालाही फायदा होईल. त्यादृष्टीने डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमीओपॅथी यांच्या वतीने देण्यात येणारे डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते २४ डॉक्टरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ होमीओपॅथी मेडिकल कॉलेजेस आॅफ महाराष्ट्रचे सचिव पृथ्वीराज पाटील, आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात २०१२ ते २०२० पर्यंत असे एकूण आठ वर्षांतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
लवकरच शासकीय होमीओपॅथी रुग्णालय
गेल्या काही वर्षांत होमीओपॅथी औषधप्रणालीचा जगभर प्रसार होत आहे. युरोप, अमेरिका, आखाती देशांसह प्रगत देशांत होमीओपॅथीकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. राज्यात होमीओपॅथीची ५४ महाविद्यालये असून ती खासगी आहेत. भविष्यात शासकीय होमीओपॅथी महाविद्यालय सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
होमीओपॅथीमध्ये सेवा देणाऱ्यांचा सन्मान करणार
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आगामी काळात होमीओपॅथीमध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. होमीओपॅथी विद्यार्थी, प्राचार्य, डॉक्टर, संशोधक यांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी गौरव करण्यात येईल. होमीओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवा मिळण्याबाबतच्या मुद्द्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही देशमुख यांनी या वेळी स्पष्ट केले.
तीन डॉक्टरांना मरणोत्तर विशेष पुरस्कार
औरंगाबादचे कै. डॉ. शांतीलाल मोतीलाल देसरडा, ठाण्याचे कै. डॉ. मिलिंद वासुदेव राव आणि परभणीचे कै. डॉ. संदीप सोनापंत नरवाडकर यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला.
डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार मिळविलेल्या डॉक्टरांची नावे पुढीलप्रमाणे
२०१२-१३
डॉ. गोविंदराजन शंकरन, मुंबई
डॉ. विलास गजानन डांगरे, नागपूर
डॉ. राजेंद्र अरविंद श्रीमाळी, कोपरगाव
२०१३-१४
डॉ. राजेंद्र शिवचंद सबद्रा, नाशिक
डॉ. विद्यासागर लक्ष्मणराव उमळकर, मुंबई
डॉ. अशोक लक्ष्मणराव वनमाळी, गडचिरोली
२०१४-१५
डॉ. रमेश लखीचंद जैन, धुळे
डॉ. संजीव मनोहर डोळे, पुणे
डॉ. सुनील भास्कर आठवले, देवगड
२०१५-१६
डॉ. गोविंद प्रतापराव तितर, मुंबई
डॉ. यशवंत विठ्ठलराव खोब्रागडे, नागपूर
डॉ. प्रशांत गोवर्धन शेठ, वाशी, मुंबई
२०१६-१७
डॉ. अमरसिंह दत्ताराम निकम, पुणे
डॉ. बापूराव विश्वनाथराव धाकुलकर, नागपूर
डॉ. प्रमोदिनी प्रकाश पागे, मुंबई
२०१७-१८
डॉ. विलास सिमरतलाल वोरा, औरंगाबाद
डॉ. कुमार मित्रचंद्र ढवळे, पालघर
डॉ. रोझारिओ पास्कल डिसोझा, आजरा
२०१८-१९
डॉ. रामगोपाल धनराज तापडिया, अमरावती
डॉ. कांचन शांतीलाल देसरडा, औरंगाबाद
डॉ. किशोर ओंकारराव मालोकर, अकोला
२०१९-२०
- डॉ. फारुख फकरुद्दीन मोतीवाला, नाशिक
- डॉ. रवीकुमार गजानन जाधव, कोल्हापूर
- डॉ. अमय श्यामकांत तळवलकर, पुणे