सन २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:37 AM2018-05-18T05:37:17+5:302018-05-18T05:37:17+5:30

सन २०११ पर्यंतच्या अपात्र झोपडपट्टीवासियांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येणार आहेत.

Homes to slums till 2011 | सन २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना घरे

सन २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना घरे

googlenewsNext

मुंबई : सन २०११ पर्यंतच्या अपात्र झोपडपट्टीवासियांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ पर्यंतच्या अपात्र झोपडपटटीधारकांना एसआरए अंतर्गत घरे मिळतील पण ती सशुल्क असतील. या संदर्भात शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे
मुंबईत २००० ते २०११ पर्यंतच्या काळातील सुमारे साडेतीन लाख झोपडया असून त्यात १८ लाख झोपडपट्टीवासीय राहतात. या घरांची किंमत त्या त्या भागातील प्रकल्पाच्या खर्चानुसार एसआरएचे सीईओ ठरविणार आहेत. मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या क्षेत्रातील झोपडयांना ही योजना लागू करण्यात आली आहे. सन २००० पर्यंतच्या झोपडपटटीधारकांना पात्र ठरविण्यात आले असून त्यांच्या झोपड्यांचा पुनर्विकास करून त्यांना मोफत घर देण्यात येते. आता २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांनाही सशुल्क घर मिळणार आहे.
>पुरावा सादर करावा लागणार
झोपडीधारकास २००१ ते २०११ या कालावधीतील पुरावा सादर करावा लागणार आहे. या कालावधीत जर अन्य कोणी व्यक्तीने ती झोपडी घेतली असल्यास त्या व्यक्तीला २०११ पर्यंतच्या वास्तव्याचा पुरावा दयावा लागणार आहे. एसआरएतील मोफत घर १० वर्षांपर्यंत विकता येत नाही. मात्र या योजनेतील घर १० वर्षांच्या आत विकता देखील येईल. मात्र हे घर कुटुंबाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित झाले तर संबंधित व्यक्ती भविष्यात सवलतीच्या दराने सदनिका घेण्यास पात्र ठरणार नाही.

Web Title: Homes to slums till 2011

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.