गृहपाठ - शिकणं समृद्ध करणारी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:24 AM2018-12-19T05:24:57+5:302018-12-19T05:25:14+5:30

एकंदरीतच शैक्षणिक विचारांचे आदानप्रदान व्हावे. त्या उपक्रमांची उपयोगिता व परिणामकारकता पडताळता यावी,

Homework - Learning Enhancer | गृहपाठ - शिकणं समृद्ध करणारी वारी

गृहपाठ - शिकणं समृद्ध करणारी वारी

Next

संतोष सोनवणे

वारी अर्थात भगवंताच्या भेटीसाठी अनवाणी पायी चालत जाणारी भक्तांची दिंडी. भगवंताच्या भेटीची आस आणि त्यासाठी आपले देहभान हरपून गेलेला भक्त यांचे अपूर्व दर्शन यात घडते. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक भक्तिमय परंपरेची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा घेतली आहे. अशा या अलौकिक परंपरेचा आधार घेऊन गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शिक्षणाची वारी सुरू झाली आहे.

शिक्षण हे असे क्षेत्र आहे, जेथे प्रयोगाला खूप वाव आहे. नवनवीन उपक्र मांना खूप संधी आहेत. त्यात आपला महाराष्ट्र म्हणजे देशातील शैक्षणिक प्रयोगशाळाच. त्यामुळे इथले शैक्षणिक प्रयोग हे सदैव देशाला व एकूणच शिक्षणप्रकियेला नवीन दिशा देणारे ठरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पनेने उजळून निघाला आहे. प्रत्येक मूल शिकलं पाहिजे व ते प्रगत झाले पाहिजे, या एकाच उद्देशाने विविध उपक्र म व कार्यक्र मांनी महाराष्ट्रातील शाळा व शाळेतील शिक्षक झपाटल्यागत कामाला लागले आहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील काही कल्पक व उपक्रमशील शिक्षकांचे शैक्षणिक प्रयोग व उपक्र म हे सर्वांना पाहता यावेत, अशी मांडणी व्हावी.

एकंदरीतच शैक्षणिक विचारांचे आदानप्रदान व्हावे. त्या उपक्रमांची उपयोगिता व परिणामकारकता पडताळता यावी, या उदात्त हेतूने शिक्षणाची वारी या एका नावीन्यपूर्ण व चैतन्यदायी उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे. यंदा या वारीचे राज्यात पाच ठिकाणी तसेच मुंबई व कोल्हापूर या दोन ठिकाणी विभागीय स्तरावर अतिशय प्रभावी असे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे, ते शाळेत टिकले पाहिजे आणि त्याला दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. याकरिता शासन शाळा व शिक्षण यांच्यासंदर्भात विशेष आग्रही आहेत. प्रत्येक मूल हे शिकून प्रगत झाले पाहिजे, याकरिता सोयीसुविधा यांच्यासोबतच नावीन्यता व संशोधक वृत्ती वाढीस लागायला हवी. याकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्र माने अनेक संधी या मुलांसोबत शिक्षकांनाही उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच एका नावीन्यपूर्ण संधीची ही गोष्ट.

शिक्षणाच्या वारीची संकल्पना
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून या शिक्षणाच्या वारीचा उगम झाला. पंंढरीच्या वारीचा अनेक शतकांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारे ज्ञानाचीही वारी निघते, ही कल्पनाच मुळी खूपच विलक्षण वाटते. शिक्षण क्षेत्रातील तसेच ज्याचे या क्षेत्राशी ऋ णानुबंध जुळलेले आहेत, तो या वारीच्या माध्यमातून अंतरंगातून ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांत मुलांच्या शिक्षणाकरिता शिक्षकबांधव नवनवीन उपक्र मांची आखणी करतोय. त्यातून मूल शिकतेय व प्रगत होतेय, याची माहिती उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांना व्हावी. त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी. यासाठी या वैविध्यपूर्ण उपक्र माची मांदियाळी भरावी, याकरिता या शिक्षणाच्या वारीचा अभिनव उपक्र म.

शिक्षणाच्या वारीचे स्वरूप, व्याप्ती आणि तिचे समाजातील कार्य
यंदा वारीचे हे चौथे वर्ष आहे. अतिशय उत्तम प्रकारे याचे नियोजन या शिक्षणाच्या वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत, तर खान्देशपासून मराठवाडा-प. महाराष्ट्रापर्यंत सगळ्याच जिल्ह्यांनी व जिल्ह्यातील शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता. हजारो शिक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन या वारीचा लाभ घेतला होता. यंदाच्या या वारीचे आयोजन अतिशय विचारपूर्वक व नियोजनबद्ध केलेले दिसून येत आहे. यात प्रामुख्याने उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षकांना संधी तसेच महाराष्ट्रातील मुले प्रगत झाली पाहिजेत, याचा विचार गांभीर्याने केलेला दिसून येत आहे. सुमारे चारशेहून अधिक प्रवेशिकांतून पडताळणी करून प्रभावी अशा ५०० शिक्षकांचे प्रयोग व उपक्र म या वारीत पाहायला मिळत आहेत.

यामध्ये ज्ञानरचनावाद, ई लर्निंग, भाषा शिक्षण, पाठ्यपुस्तक शिकविण्याच्या नव्या पद्धती, शिक्षणातील समाज सहभागाचे मूल्य, दिव्यांग मुलांचे शिक्षण, बोलीभाषा, स्पोकन इंग्लिश , कृतीयुक्त विज्ञान, अभिजात भाषाकला, कार्यानुभव, नाविन्यपूर्ण प्रयोग, क्र ीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन मुलींचे शिक्षण इ. विविध विषयांचे विभाग या वारीत पाहावयास मिळत आहे. या वारीतल्या स्टॉलचा जर सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर एक उल्लेखनीय व विशेष बाब लक्षात येते की, यात मुलांचं शिकणं कसं होईल याचा अधिक विचार केलेला दिसून येत आहे.

मुलाच्या शिकण्याकरिता त्याच्या अवतीभोवतीचे सारे वलय या वारीत पाहायला मिळत आहेत. मग ते काही वेळेस वर्गात तर कधी वर्गाबाहेर, तर कधी घरात तर कधी समाजात अशा अनेक विचारांनी ही वारी समृद्ध वाटते.वाडी वस्तीवरचा शिक्षक मुलांसाठी कायकाय करतोय याचे जिवंत दर्शन या वारीत पाहायला मिळत आहे. त्यात अगदी दगड, गोट्यांपासून ते थेट इंटरनेटच्या माध्यमातून अवकाशापर्यंत घेतलेली झेप थक्क करून टाकते. मुंबई व कोल्हापूर या विभागीय स्तरानंतर ही वारी पुढच्या महिन्यात वर्धा, नांदेड आणि समारोपाकरीता जळगावला जातेय.

ज्ञानाच्या कक्षा रुंदावयाला गरज असते ती एका झपाटलेल्या ध्येयाची. अशी झपाटलेली शिक्षक मंडळी या वारीत पाहायला मिळत आहेत. अशाप्रकारे शिक्षण, ज्ञान व शाळा या संकल्पना शिक्षणाच्या वारीच्या रूपाने शिक्षक, पालक व समाज यांच्याकरीता एका नव्या व अभिनव पद्धतीने समोर येण्यास मदत होणार आहे. हजारो भेटी देणारे शिक्षक यातून प्रेरणा घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात नव्या उमेदीने उभे राहणार आहेत. आंतरिक शिक्षणाचे भक्तिमय वेड लावलेली वारी ज्ञानमय होऊन सारस्वतांच्या भक्तांना वेड लावणार यात काही शंकाच नाही.

Web Title: Homework - Learning Enhancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई