Join us

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना देणार होमिओपॅथिकच्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 6:48 PM

एसटी कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होणार मदत

मुंबई : लॉकडाऊन काळात एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीची सेवा देत आहेत. या वाहतुकीमध्ये प्रत्यक्ष कोरोनाच्या रुग्णांना हाताळणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रवासादरम्यान एसटीच्या चालक, वाहकांशी संपर्क येतो. यातून एसटी कामगारांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे जे कर्मचारी प्रत्यक्ष प्रवासी सेवा देत आहेत ,अशा सर्व कर्मचाऱ्यांना राज्यसरकारने दिलेल्या वैद्यकीय मानकानुसार कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी. यासाठी 'अर्सनिक अल्बम ३०'  होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. 

मुंबई, पालघर, ठाणे येथे एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. यासह राज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी व जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे एसटी कामगारांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे.  ही प्रवासी सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्‍ती वाढावी. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारच्या वैद्यकीय मानकांनुसार असेऺनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाची दिली जाणार आहेत.  ते औषध कशाप्रकारे घ्यावे, याच्या देखील सूचना कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या