गोराईत वकील पत्नीचा धुडगूस
By admin | Published: February 26, 2015 01:30 AM2015-02-26T01:30:54+5:302015-02-26T01:30:54+5:30
बोरीवलीच्या गोराई वसाहतीत राहणाऱ्या मायलेकींनी मिळून एका बांधकाम मजुरासह शेजारी राहणाऱ्या तिघांवर प्राणघातक हल्ला केला
बोरीवली : बोरीवलीच्या गोराई वसाहतीत राहणाऱ्या मायलेकींनी मिळून एका बांधकाम मजुरासह शेजारी राहणाऱ्या तिघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. बिजना ज्ञानचंद मौर्या आणि सुप्रियांका असे मायलेकीचे नाव आहे. बिजनाचे पती वकील आहेत. बोरीवली पोलिसांनी दोघींवर गुन्हा नोंदविला आहे.
गोराई क्रमांक दोन येथील वर्षा सोसायटीत सिमेंटचा कोबा घालण्याचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी बिजनाच्या घरासमोर काम सुरू झाले तेव्हा बांधकाम मजूर चंदर चौहानला (३५) अचानकपणे लाकडी बांबूने मारहाण सुरू केली. शेजारी प्रतीक अरु ण दरेकर आणि शिल्पा ब्रह्मा शेळके हे चंदरच्या मदतीला धावून आले. तेव्हा बिजनाने सुरीने दोघांच्या हातावर वार केले. या हल्ल्यात शेळके आणि दरेकर जखमी झाले. त्या दोघांना वाचविण्यासाठी धावलेले नंदकुमार किशोर नाईक यांच्या डोक्यात बिजनाने दगड घातला. त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.