‘समलैंगिक संबंध गुन्हा नाही’

By admin | Published: December 14, 2015 01:42 AM2015-12-14T01:42:02+5:302015-12-14T01:42:02+5:30

परस्पर संमतीने होणाऱ्या समलिंगी संंबंधांना जगातील बहुतेक देशांमध्ये मान्यता आहे. काही देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहेत

'Homosexuality is not a crime' | ‘समलैंगिक संबंध गुन्हा नाही’

‘समलैंगिक संबंध गुन्हा नाही’

Next

मुंबई : परस्पर संमतीने होणाऱ्या समलिंगी संंबंधांना जगातील बहुतेक देशांमध्ये मान्यता आहे. काही देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहेत. समलिंगी संबंध आपल्याकडे कायद्याने गुन्हा ठरला असला तरी एलजीबीटी समुदायात मोडणारी माणसेही सामान्य नागरिक आहेत. त्यांची घृणा न बाळगता त्यांनाही समाजात समान स्थान मिळावे, या उद्देशाने मुंबईतील एलजीबीटी समुदायातर्फे ३७७ कलमाला ११ डिसेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘क्विअर हग’ अभियानाचे आयोजन केले होते.
न्यायालयाने समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवल्याने एलजीबीटी समुदायातील कॉलेजवयीन मुलांनी मरिन ड्राइव्ह येथे शनिवारी शोततापूर्ण वातावरणात कायद्याबाबत निषेध व्यक्त केला. या कार्यक्रमांतर्गत तरुणांनी हातात संदेशाचे फलक घेऊन समलैंगिक हा आजार नसून ती एक भावना आहे, जी कोणामध्येही असू शकते. त्यामुळे समलैंगिक असणे हा अपराध नाही. ती नैसर्गिक भावना आहे, अशी जनजागृती यानिमित्ताने या तरुणांकडून करण्यात आली. या कार्यक्रमात एनआरआय व्यक्तींनीही उपस्थिती लावली होती. त्यात आॅस्ट्रेलिया, बेल्जिअम, इंग्लंड, अशा विविध देशांतील लोकांनी या समलैंगिक तरुणांना आलिंगन देत समानतेचा संदेश दिला.

Web Title: 'Homosexuality is not a crime'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.