सलाम मान्यवरांच्या कर्तृत्त्वाला... सलाम परंपरेला!
By admin | Published: April 15, 2017 02:51 AM2017-04-15T02:51:38+5:302017-04-15T02:51:38+5:30
अविरत कष्ट, प्रचंड मेहनत आणि नाविन्याची कास धरत वेगवेगळ््या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या मान्यवरांचा गौरव करत त्यांच्या कर्तृत्त्वाला, त्यांनी जपलेल्या
ठाणे : अविरत कष्ट, प्रचंड मेहनत आणि नाविन्याची कास धरत वेगवेगळ््या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या मान्यवरांचा गौरव करत त्यांच्या कर्तृत्त्वाला, त्यांनी जपलेल्या परंपरेला ‘लोकमत’तर्फे सलाम करण्यात आला. अनेक हृद्य क्षणांची पखरण करत ठाण्यात गुरूवारी पार पडलेला ‘लोकमत लीगसी अॅवॉर्ड’चा भव्य सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. विश्वासाचे नाते अधिक दृढ करत गेला.
समाजातील वेगवेगळ््या क्षेत्रावर कर्तृत्वाचा, प्रयत्नांचा, नाविन्याचा ठसा उमटवून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्याच कुटुंबातील नव्या पिढीकडे तो वारसा सोपवणाऱ्या, या नव्या पिढीतून अधिक आशादायी नेतृत्व उभे करणाऱ्यांचा गौरव ‘लोकमत’ने गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये ‘लीगसी अॅवॉर्ड’ देऊन केला.
ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे, उद्योजक संजीव पेंढरकर, अर्थ आणि व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या उपस्थितीत, भव्य स्वरूपात हा सोहळा पार पडला. रिजन्सी ग्रुप या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक; तर रोनक अॅडव्हर्टायझर सोहळ्याचे पार्टनर होते. या कार्यक्रमाला वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कर्तृत्त्वाचा सन्मान करण्याच्या ‘लोकमत’च्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
लीगसीची परंपरा दर्शवणारे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्याचवेळी त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ््यांचा गजर करीत सत्कारमूर्तींना मानवंदना दिली.
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून या दिमाखदार सोहळ््याला सुरूवात झाली. परंपरेचे महत्त्व जपणारी गीते, मान्यवरांचे मनोगत यातून हा सोहळा विलक्षण भावपूर्ण झाला. वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी प्रास्तविक केले. ठाणे जिल्ह्यात ‘लोकमत’ने ‘काहीतरी कर ठाणेकर’, ‘काहीतरी कर डोंबिवलीकर’सारखे उपक्रम आणि त्यातून सोडविलेले प्रश्न, जपलेली सामाजिक बांधिलकी आणि त्याला वाचकांचा मिळणारा भरभरून प्रतिसाद यांचा गौरवपर उल्लेख त्यांनी केला. ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी ‘लीगसी’ या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीमागची प्रेरणा स्पष्ट केली. या मागचा उद्देश, त्यातून समोर आलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या परंपरांचा आढावा त्यांनी घेतला. गौरवाची ही परंपरा ठाण्यातून सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ (मुंबई) चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, जाहिरात विभागाचे प्रमुख आसमान सेठ, रिजन्सी ग्रूपचे डायरेक्टर विकी रूपचंदानी आणि अनिल भटिजा, रोनक अॅडव्हर्टायझिंगचे अमरदीप सिंह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लीगसीत सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक समीर नातू, बांधकाम क्षेत्रात स्वत:चा आगळा ठसा उमटवणारे मनोज राय, बिल्डर आणि आर्किटेक्ट प्रिया गुरनानी, गृहबांधणीतून नवी क्षितिजे साकार करणारे सचिन शिवराम ओटवणेकर आणि विजय राजपूत, वंध्यत्व निवारणासाठी कार्यरत असणारे डॉ. संदीप माने, तन्वी हर्बलच्या माध्यमातून घरोघरच्या फॅमिली डॉक्टर बनलेल्या मेधा मेहेंदळे, राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, कुळगाव-बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे, नगरसेवक मुकुंद केणी, नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक कॅ. आशीष दामले, शिक्षणतज्ज्ञ विवेक पंडित, आदर्श विद्यानिकेतन उभारणारे केसरीनाथ म्हात्रे या मान्यवरांचा समावेश आहे. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘लोकमत’चे ‘महाराष्ट्रीयन... आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याचे यावेळी सादरीकरण झाले. उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपसरव्यवस्थापक राघवेंद्र शेठ यांनी आभार मानले. सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे आणि उत्तरा मोने यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांतील
आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रगीताने सोहळ््याची सांगता झाली. (प्रतिनिधी)