Join us

हा सन्मान माझ्या ‘अंध’ मुलांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 3:14 AM

‘अंध मुलांच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचले आहे. ही अंध मुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य माझ्या हातून घडले.

मुंबई: ‘अंध मुलांच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचले आहे. ही अंध मुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य माझ्या हातून घडले. या अंध विद्यार्थ्यांमुळेच आतापर्यंत अनेक सन्मान मिळाले. हा सन्मान माझा नसून त्यांचा आहे,’ असे गौरवोद्गार सुहासिनी मांजरेकर यांनी ‘सखी सन्मान’ सोहळ््यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना काढले. ‘लोकमत’ सखी मंचतर्फे गुरुवारी ‘लोकमत सखी सन्मान’ सोहळ््याचे आयोजन दादर येथील धुरू सभागृहामध्ये करण्यात आले होते. सखींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यावेळी सुहासिनी मांजरेकर बोलत होत्या. या प्रसंगी शिक्षक आमदार रामनाथ मोते उपस्थित होते. ‘जीवनगौरव’ स्वीकारताना सुहासिनी मांजरेकर यांनी अंध शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या आठवणींनी उपस्थित सखीही गहिवरल्या. सुहासिनी मांजरेकर म्हणाल्या की, ‘अंध मुलांमधील कला वाखाण्याजोगी असते. माझ्या शाळेतील अंध मुले विविध क्षेत्रांत पुढे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के आहे. प्रत्येक मुलाला ७० टक्क्यांच्या वर गुण आहेत. या सोबतच अगदी घरगुती कामांपासून ते कलाकुसरीची कामे ते अत्यंत नेटाने करतात.’ विद्यार्थ्यांच्या आॅर्केस्ट्राविषयी त्या म्हणाल्या की, ‘लवकरच अंध मुलांचा बँड दुबई आणि स्वित्झर्लंड येथे सादरीकरण करायला जाणार आहे.’ सन्मान सोहळ््यातील सखींविषयी आमदार रामनाथ मोते यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, ‘महिला या घर आणि सामाजिक जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असतात. त्यातील ही जिद्द त्यांनी कधीही सोडू नये. त्यांच्यातील चिकाटीमुळेच त्या सर्व क्षेत्रांत अधिराज्य गाजवतात.’ या कार्यक्रमात रंगत भरली ती ‘अष्टप्रीतीसुमनांजली’ या संगीत कार्यक्रमाने. शालेय विद्यार्थ्यांनी गाण्याचे सादरीकरण करून कार्यक्रमात सुरांचे रंग भरले. (प्रतिनिधी) पदरावरती जरतारीचा....‘सखी सन्मान’ सोहळ््या वेळी लक्ष पैठणीसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये स्वाती पोळ या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना लक्षतर्फे पैठणी देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार विजेते...सामाजिक विभागमुमताज शेखकल्पना शिंदेमीनल मंडलिकऔद्योगिक विभागसुरक्षा घोसाळकर, फोकसनेहा ठक्करसुनंदा दंडगव्हाळआरोग्य विभाग डॉ. रागिणी पारेख,डॉ. आरती गायकवाड,सोनाली लोहारक्रीडा पुरस्कार साईली म्हैसधुणे शीतल भोर, खो-खो

शैक्षणिक विभागलीना कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका, अँटोलिया डिसिल्व्हा हायस्कूल, दादरमीरा कोरडे, मंजुश्री अहिरराव सांस्कृतिक / कला विभागदीपाली काळेअर्चना नेवरेकर, अभिनेत्रीयेगिनी चौक , अभिनेत्रीशौर्य पुरस्कार : राणी काळे