आदेशाचा सन्मान, पण भुकेचे काय? कारागिरांचे जगणे झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:22 AM2020-06-13T06:22:12+5:302020-06-13T06:22:19+5:30

‘सलून’चे आंदोलन; राज्यभरात कारागिरांचे जगणे झाले कठीण

Honor of order, but what of hunger? It became difficult for the artisans to survive | आदेशाचा सन्मान, पण भुकेचे काय? कारागिरांचे जगणे झाले कठीण

आदेशाचा सन्मान, पण भुकेचे काय? कारागिरांचे जगणे झाले कठीण

Next

नागपूर : राज्यात लॉकडाऊनची घोषणा २३ मार्चला झाली. पण नागपूर शहरात मात्र १९ मार्चपासून दुकाने बंद आहेत. सरकारच्या घोषणेपूर्वीच नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरुवातीचे तीन दिवस सलून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र जवळपास ८१ दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शासनाच्या आदेशाचा सन्मान, पण भुकेचे काय?, असा प्रश्न सलून व्यावसायिक करत आहेत.

सलून व्यावसायिकांचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. नागपूर शहरासह जिल्हाभरातील सुमारे १७ ते २० हजार सलून दुकानदारांची अवस्था लॉकडाऊनमुळे वाईट झाली आहे. दुकानात काम करणाऱ्यांचाही रोजगार गेला आहे. अनेकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन दुकान थाटले आहे. एका दुकानात सुमारे दोन ते पाच कारागीर कामाला असतात. भूक आणि भविष्याच्या चिंतेने आंदोलनाचे शस्त्र उपसून गेल्या चार दिवसांपासून दुकानदार आणि कारागीर वर्ग रस्त्यावर उतरला आहे.

या आहेत मागण्या
1सरकारने सलून व्यवसायाला सूट देऊन व्यवसायास परवानगी द्यावी.
2प्रत्येक कारागीर व दुकानदारांना लॉकडाऊन काळात १० ते १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.
3दुकानदारांना २५ ते ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य द्यावे.
4दुकानदार व कारागिरांचा ५० हजार रुपयांचा विमा उतरविला जावा.
5सुरक्षित व्यवसाय करण्यासाठी सरकारने पीपीई किट आणि अन्य साधने पुरवावी.
6लॉकडाऊन काळातील दुकानभाडे आणि वीज बिल माफ करावे.

Web Title: Honor of order, but what of hunger? It became difficult for the artisans to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.