Join us  

मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 6:09 AM

विद्यापीठाने १००१-१२००च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे. विषयनिहाय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत १०१-१५० या बँडमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने मोहोर उमटवली आहे. तर आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत विद्यापीठाने ६७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विद्यापीठाने १००१-१२००च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे. विषयनिहाय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत १०१-१५० या बँडमध्ये प्रवेश केला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७११-७२०च्या बँडमधून ६३१-६४०च्या बँडमध्ये प्रवेश केला आहे. त्या खालोखाल सिम्बॉयसिस ६४१-६५० या बँडमध्ये आहे तर मुंबई विद्यापीठाने ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे.

‘आयआयटी’सह राज्यातील चार शिक्षण संस्था क्रमवारीतमुंबई आयआयटीसह पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत क्यूएसच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या १००० शिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. यात मुंबई आयआयटी देशात पहिल्या स्थानावर आहे.

कामगिरी का सुधारली ? विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू केले आहेत. देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही अतुलनीय कामगिरी.  पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली.  आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समधील संशोधन पेपर्समध्ये १५६ टक्क्यांनी वाढ.  विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता.  विद्यापीठाशी सलंग्नीत असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारिणींवर कार्यरत. गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आले.

विद्यापीठाची कामगिरीएम्प्लॉयमेंट आऊटकम - ८१.४ गुणसायटेशन पर फॅकल्टी - ३०.९एम्प्लॉयर रेप्युटेशन - २८.८इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क - १८.३ॲकॅडमिक रेप्युटेशन - ९.१फॅकल्टी स्टुडंट्स रेशो - २.८ 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ