शटर बंद करून सुरू होते हुक्का पार्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:13+5:302020-12-30T04:08:13+5:30

१५ जणांना अटक : मालाडमध्ये गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत नाईट कर्फ्यू असतानाही मध्यरात्री उशिरापर्यंत ...

Hookah parlor starts by closing the shutters | शटर बंद करून सुरू होते हुक्का पार्लर

शटर बंद करून सुरू होते हुक्का पार्लर

Next

१५ जणांना अटक : मालाडमध्ये गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत नाईट कर्फ्यू असतानाही मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. मालाड येथील मनरंगी हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली. एकूण १५ जणांना अटक करण्यात आली.

शटर बंद करून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवैधपणे हे हुक्का पार्लर सुरू होते. गुन्हे शाखेला याबाबत समजताच पथकाने छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जमावबंदीचे उल्लंघन आणि कोविड काळात नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ७ कर्मचारी आणि ८ ग्राहकांना अटक करण्यात आली. या हुक्का पार्लरमध्ये तंबाखूयुक्त हुक्क्याचे सेवन केले जात असल्याचे तपासातून समोर आले.

यापूर्वी गुन्हे शाखेच्या सीआययूने गोरेगावमधून ८ कोटी रुपयांचा साडेतीन टन हुक्का जप्त केला होता.

Web Title: Hookah parlor starts by closing the shutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.