Join us

बोरीवलीच्या चाळींमध्ये माकडांची ‘हुप, हुप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:49 AM

कोरोनाचा फटका प्राण्यांनाही : रहिवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ आणि ‘अनलॉक’मध्ये सामान्य नागरिकांची दमछाक होत असताना प्राण्यांचीही अवस्था वाईट झाली आहे. याचाच परिणाम म्हणून बोरीवलीच्या चाळींमध्ये माकडांची ‘हुप हुप’ सुरू झाली असून, यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बोरीवली पूर्वच्या कस्तुरबा मार्ग क्रमांक ४ येथील गीता भवनमध्ये घरात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच खिडकीमध्ये बसून खाण्यापिण्याच्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न करतात. गेल्या १५ दिवसांपासून घर आणि बाजारामध्ये माकडांच्या टोळ्या मोठ्या संख्येने शिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र या सगळ्यात त्यांनी लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांना काही इजा केली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे.तज्ज्ञांच्या मते बोरीवलीचे नॅशनल पार्क हे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद आहे. पर्यटक यायचे त्यावेळी त्यांना खाण्यापिण्यासाठी काहीना काही मिळायचे. मात्र आता त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी अन्नाच्या शोधात हे प्राणी आसपासच्या परिसरात शिरकाव करत आहेत. मध्यंतरी मालाडच्या मालवणी परिसरातही काही घरांवर माकड उड्या मारू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.बाजारांमध्ये शिरकावच्बोरीवली पूर्वच्या कस्तुरबा मार्ग क्रमांक ४ येथील गीता भवनमध्ये घरात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच खिडकीमध्ये बसून खाण्यापिण्याच्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न करतात.च्गेल्या १५ दिवसांपासून घर आणि बाजारामध्ये माकडांच्या टोळ्या मोठ्या संख्येने शिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईबोरिवली