कल्याणचे ‘ते’ चौघे लवकरच परतण्याची आशा
By admin | Published: November 26, 2014 02:52 AM2014-11-26T02:52:20+5:302014-11-26T02:52:20+5:30
इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघेही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे.
Next
डिप्पी वांकाणी - मुंबई
इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघेही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिका:यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रंनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचेही एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.
कल्याणमधील आरिफ माजिद, फहाद शेख, अमान तांडेल आणि सहीम टंकी या चार तरुणांनी 25 मे रोजी 4क् जणांसोबत इतिहाद विमानाने बगदाद गाठले होते. त्यानंतर हे चौघेही बेपत्ता होते. इराकमध्ये धुडगूस घालत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेत ते सामील झाल्याची माहिती गेल्या काही दिवसांत पसरली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक याचा तपास करत होते.
26 ऑगस्ट रोजी सहीम याने त्याच्या भावाला आरिफचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचे फोनवरून कळवले होते. आरिफच्या वडिलांनी मात्र तो जिवंत असल्याचा दावा केला होता. आपल्याला त्याचा फोन आला होता आणि तो भारतात परत येऊ इच्छितो अशी अपेक्षाही व्यक्त केली होती, असेही त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले होते.
या चौघांची त्यांच्या कुटुंबाशी भेट घालून देण्यासाठी गृहखात्यानेही तयारी चालवल्याचे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिका:याने सांगितले.