होरमुसजी कामा एबीसीचे अध्यक्ष, ‘लोकमत’चे देवेंद्र दर्डा सचिव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:19 PM2018-09-14T23:19:27+5:302018-09-14T23:21:43+5:30
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची सचिवपदी निवड
मुंबई : होरमुसजी कामा यांची आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते ‘मुंबई समाचार’चे संचालक आहेत. लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची सचिवपदी निवड झाली आहे.
होरमुसजी कामा हे सलग दोन वेळा इंडियन न्युजपेपर सोसायटी (आयएनएस), प्रेस ट्रस्ट आॅफ इंडिया (पीटीआय) व मीडिया रिसर्च युझर्स कॉन्सिलचे (एमआरयूसी) अध्यक्ष होते. आत्तासुद्धा ते आयएनएस, पीटीआय व एमआरयूसीमध्ये सक्रीय आहेत.
डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेडचे माजी अध्यक्ष मधूकर कामत यांची जाहिरात एजन्सीजचे प्रतिनिधी या नात्याने उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. एबीसीच्या या २०१८-१९ च्या कार्यकारिणीत प्रकाशक श्रेणीतील आठ, जाहिरात एजन्सीज श्रेणीतील चार व जाहिरातदारांचे प्रतिनिधी या नात्याने दोन सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. होरमुझ मसानी हे महासचिव म्हणून काम बघतील.
२०१८-१९ ची कार्यकारिणी :
प्रकाशकांचे प्रतिनिधी : अध्यक्ष : होरमुसजी कामा (मुंबई समाचार), सचिव : देवेंद्र दर्डा (लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड), सदस्य : शैलेश गुप्ता, (जागरण प्रकाशन), देबब्रत मुखर्जी (हिंदुस्थान मीडिया व्हेंचर्स), चंदन मजुमदार (एबीपी प्रा. लि.), राज कुमार जैन (बेनेट कोलमन अँड कंपनी) प्रताप पवार (सकाळ), रियाद मॅथ्यू (मलयला मनोरमा)
जाहिरात एजन्सीसचे प्रतिनिधी : उपाध्यक्ष : मधूकर कामत (डीडीबी मुद्रा), कोषाध्यक्ष : शशीधर सिन्हा, (आयपीजी मीडियाब्रॅण्ड्स), श्रीनिवासन स्वामी (आर के स्वामी बीबीडीओ प्रा.लि.), समीर सिंह (ग्रृप एम मीडिया इंडिया प्रा. लि.)
जाहिरातदारांचे प्रतिनिधी : मयंक पारीक (टाटा मोटर्स लिमिटेड) व करुणेश बजाज (आयटीसी लिमिटेड)
सचिवालय : महासचिव : होरमुझ मसानी