नेरळ : पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीचा थरार सर्वांना परिचित आहे. मात्र या बैलगाडी शर्यतीसोबतच आता अश्वशर्यतींचा थरारही मावळातील नागरिकांनी अनुभवला. या शर्यतीत रायगडातील नेरळ येथील भगवान चंचे यांच्या सोन्या या अश्वाने प्रथम क्रमांक पटकावला.पुणे जिल्ह्यातील मावळ, वडगाव येथे आयोजित महाराष्ट्र केसरी चषक अश्वशर्यतीचे नुकतेच आयोजन केले होते. ही शर्यत उत्तरोत्तर रंगतच गेली. यात संतोष शिंगाडे (माथेरान, रायगड) यांच्या आर्यन अश्वाने द्वितीय क्र मांक मिळविला. या संपूर्ण अश्वशर्यतीमध्ये रायगडमधील घोडे आघाडीवर होते. नेरळ येथील भगवान चंचे यांच्या सोन्या या अश्वाने प्रथम क्र मांकाचे ५१ हजार तर संतोष शिंगाडे यांच्या आर्यनने ३१ हजार रु पयांचे व्दितीय क्र मांकाचे पारितोषिक मिळविले. शिंगाडे यांच्याच एलियनने २१ हजार रु पयांचे तृतीय क्र मांकाचे बक्षीस मिळविले. बैलगाडी शर्यतीवर बंदी आली असली तर घोड्यांच्या शर्यतीवर बंदी नसल्याने मावळ तालुक्यात प्रथमच प्रसिध्द बैलगाडी मालक बाबुराव वायकर यांच्या मित्रपरिवाराने अश्वशर्यतीचे आयोजन करु न अश्वशर्यतीला सुरूवात केली आहे.शर्यतीत १२0 अश्वांचा सहभाग होता. शर्यत पाहण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती. शर्यतीत एकावेळी १0 अश्व शर्यतीच्या धावपट्टीवर धावत होते. पुणे, रायगड, सातारा, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर , बीड व मुंबई परिसरातील अश्वांनी सहभाग घेतला. या अश्वशर्यतीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी झेंडा दाखवून सुरु वात केली. बारणे यांनी बैलगाडी शर्यत सुरु करण्यासाठी माझ्यासह १२ खासदार प्रयत्न करत असून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर बैलगाडी शर्यती लवकरच सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, मावळचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबन भेगडे, उद्योजक भावेन पटेल, मंगेश म्हसकर, विलास काळोखे, माजी उपसरपंच बाळासाहेब म्हाळसकर, अंकुश आंबेकर, काळुराम मालपोटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा सरचिटणीस अतुल वायकर, शरद ढोरे, सुहास वायकर, सागर वायकर, संतोष वायकर यांच्यासह हजारो शौकीन उपस्थित होते. (वार्ताहर)
अश्वशर्यतींचा थरार...
By admin | Published: April 04, 2015 10:39 PM