दासभक्तांनी केली रुग्णालयाची स्वच्छता

By admin | Published: June 15, 2014 12:42 AM2014-06-15T00:42:20+5:302014-06-15T00:42:20+5:30

ऐतिहासिक काळात नबाब सरकारने मुरुड शहरातील नागरिकांसाठी लेडी कुलसूम बेगम रुग्णालयाची निर्मिती केली होती.

Hospital cleanliness by the servants | दासभक्तांनी केली रुग्णालयाची स्वच्छता

दासभक्तांनी केली रुग्णालयाची स्वच्छता

Next

नांदगाव : ऐतिहासिक काळात नबाब सरकारने मुरुड शहरातील नागरिकांसाठी लेडी कुलसूम बेगम रुग्णालयाची निर्मिती केली होती. या रुग्णालयाची महिला प्रसतीगृह म्हणून विशेष ख्याती होती. परंतु मुरुड तालुक्याला शासनाकडून ग्रामीण रुग्णालय उपलब्ध झाल्याने जिल्हा परिषद अंतर्गत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून ते इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे लेडी कुलसूम रुग्णालय बंद स्वरूपात होते. त्यामुळे आसपासच्या परिसरात खूप मोठी झुडपे व कचरा जमा झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे हे रुग्णालय आणि परिसराची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली.
या साफसफाई मोहिमेत सुमारे दोनशे श्री सदस्य सकाळपासून सहभागी झाले होते. रुग्णालयाच्या आजूबाजूस असणारा पालापाचोळा, झाडे झुडपे, दवाखान्याच्या आतील खोल्यात असणारा सर्व कचरा साफ करून लाद्या व टोलने साफ करण्यात आल्या. झाडे झुडपे व कचरा टेम्पोत जमा करून तो दूरवर नेवून जाळण्यात आला. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बागूल यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच शहरातील रुग्णालयामध्ये ओपीडी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(वार्ताहर)

Web Title: Hospital cleanliness by the servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.