रुग्णालयाला आग

By admin | Published: February 27, 2015 01:38 AM2015-02-27T01:38:49+5:302015-02-27T01:38:49+5:30

चेंबूरच्या सांडू उद्यान परिसरातील जॉय या खासगी रुग्णालयाला दुपारी चारच्या सुमारास आग लागली. रुग्णालय कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून

Hospital fire | रुग्णालयाला आग

रुग्णालयाला आग

Next

मुंबई : चेंबूरच्या सांडू उद्यान परिसरातील जॉय या खासगी रुग्णालयाला दुपारी चारच्या सुमारास आग लागली. रुग्णालय कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून सर्वच रुग्णांना वेळीच बाहेर काढून मोठी जीवितहानी टाळल्याचे अग्निमशन दलाने लोकमतला सांगितले.
चेंबूरच्या मध्यभागी असलेल्या या खासगी रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी गर्दी असते. आजदेखील अशाच प्रकारे रुग्णांची गर्दी असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील एका वॉर्डात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. येथील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ काही महिला कर्मचारी आणि रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार चेंबूर आणि देवनार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी
एका तासात ही आग आटोक्यात आणली.
त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवल्याने अन्य वॉर्डांपर्यंत ही आग पसरली नाही. अन्यथा मोठी हानी झाली असती, अशा माहिती काही रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. घटनेनंतर चेंबूर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hospital fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.