Hospital Fire: ते दोन मृत्यू आगीमुळे नाहीत, कोरोनाबळी; सनराईज हॉस्पिटलचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:01 AM2021-03-26T09:01:57+5:302021-03-26T09:02:54+5:30
Bhandup Hospital Fire: आगीमुळे कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही, असे सनराईज हॉस्पिटलने म्हटले आहे. काही रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये तर काहींनीखासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
भांडूप परिसरातील सनराईझ हॉस्पिटलमध्ये (Sunrise hospital) आग लागल्याची घटना घडली आहे. ड्रीम्स मॉलमध्ये हे हॉस्पिटल आहे. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलपर्यंत पोहोचला. मात्र, मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचे हॉस्पिटलने म्हटले आहे. (There was a fire in first floor of Dreams mall, Bhandup and the smoke reached upto the sunrise hospital located at the top floor. There were 2 dead bodies due to corona evacuated.)
तसेच जे दोन मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे ते कोरोनामुळे मृत झालेले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या या दोन रुग्णांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही, असे सनराईज हॉस्पिटलने म्हटले आहे. काही रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये तर काहींनीखासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मुंबई फायर ब्रिगेड आणि मुंबई पोलिसांनी मदत केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.
सनराईज हॉस्पिटल कोरोना काळात कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. या हॉस्पिटलमध्ये आगरोधक यंत्रणा, नर्सिंग होम लायसन आहे. आगीनंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनीदेखील चांगले काम केले, असे हॉस्पिटलने म्हटले आहे.
Mumbai: Firefighting operation underway at the mall where a fire broke out last night; latest visuals from the spot pic.twitter.com/OTBMtJq5EK
— ANI (@ANI) March 26, 2021
याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री १२.३० च्या सुमारात ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली, लेव्हल ३-४ ची ही आग असल्यानं २३ अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले, या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर रेस्क्यू ऑपरेशनमधून आतापर्यंत ७६ रुग्णांना कोविड सेंटरला हलवण्याल आलं आहे.
आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी पेडणेकर यांनी सांगितलं की, मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये हॉस्पिटल असल्याचं पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. सध्या या हॉस्पिटलमधील ७० पेक्षा अधिक रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत अशी माहिती महापौरांनी दिली.