Join us

रुग्णालयाला आग

By admin | Published: February 27, 2015 1:38 AM

चेंबूरच्या सांडू उद्यान परिसरातील जॉय या खासगी रुग्णालयाला दुपारी चारच्या सुमारास आग लागली. रुग्णालय कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून

मुंबई : चेंबूरच्या सांडू उद्यान परिसरातील जॉय या खासगी रुग्णालयाला दुपारी चारच्या सुमारास आग लागली. रुग्णालय कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून सर्वच रुग्णांना वेळीच बाहेर काढून मोठी जीवितहानी टाळल्याचे अग्निमशन दलाने लोकमतला सांगितले.चेंबूरच्या मध्यभागी असलेल्या या खासगी रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी गर्दी असते. आजदेखील अशाच प्रकारे रुग्णांची गर्दी असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील एका वॉर्डात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. येथील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ काही महिला कर्मचारी आणि रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार चेंबूर आणि देवनार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी एका तासात ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवल्याने अन्य वॉर्डांपर्यंत ही आग पसरली नाही. अन्यथा मोठी हानी झाली असती, अशा माहिती काही रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. घटनेनंतर चेंबूर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)