मुंबई : मैत्रिणीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू असताना अचानक तिच्या प्रियकरानेच तिच्या फोनवरून चॅटिंग सुरू केले आणि शिव्यांचा वर्षाव करत, प्रेयसीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर याच चॅटिंगच्या रागात प्रियकराने, महाविद्यालयाच्या आवारातच तरुणाला स्टम्पने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी गोरेगावमध्ये उघडकीस आली.गोरेगाव परिसरात राहणारा साईकुमार सुरी (१९) हा विवेक महाविद्यालयात बीएमएमच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नेहा (नावात बदल) सोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघांमध्ये संवाद वाढला. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू झाले.२८ फेब्रुवारी रोजी, नेहमीप्रमाणे नेहासोबत चॅटिंग सुरू असतानाच अचानक नेहाच्या संदेशात शिव्या सुरू झाल्या. नेहापासून दूर राहण्याचा सल्लाही त्याला देण्यात आला. यामुळे सुरी गोंधळला. त्यानंतर त्या शिव्या प्रियकर शार खानने दिल्याचे आणि त्याला तुझ्याशी बोललेले आवडत नसल्याचे सांगत नेहाने त्याच्याशी संवाद तोडला. त्यानंतर शुक्रवार १ मार्चला सकाळीच खानने त्याला फोन केला. नेहाशी व्हॉट्सअॅपवर पुन्हा चॅटिंग केल्यास मारण्याची धमकी दिली. आम्ही फक्त मित्र आहोत असे सुरीने सांगूनही त्याने शिव्या देत फोन कट केला. मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सुरी मित्रांंसोबत महाविद्यालयाच्या उपाहारगृहात नाष्टा करीत असतानाच, शेख दोन मित्रांसोबत तेथे आला.
मैत्रिणीसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगमुळे गाठावे लागले रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 2:00 AM