मुंबई : पावसाने हजेरी लावल्याने शहरातील रुग्णालये पावसाळी आजारांशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहेत. पावसाळ््यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, कावीळ, डायरिया, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मुंबईकरांना साथीच्या आजारांवर तत्काळ उपचार मिळावेत, म्हणून महापालिका आणि शासकीय रुग्णालयात तब्बल २ हजार ३१३ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उद्यापासून तापाचा बाह्यरुग्ण विभागही महापालिका रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. पावसाळ्यात गेल्या वर्षी लेप्टोने अचानक डोके वर काढले होते. जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली होती. लेप्टोमुळे १९ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा लेप्टोमध्ये वाढ होऊ नये, म्हणून महापालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. त्याचबरोबर, साथीच्या आजाराने रुग्णाची प्रकृती खालावल्यास रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये २ हजार २२३ खाटा असून, जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात मिळून ९० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ््यात तापाच्या रुग्णांचा आकडा वाढतो. रुग्णांना ताटकळावे लागू नये, म्हणून सर्व महापालिका रुग्णालयात तापाचा बाह्यरुग्ण विभाग १३ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालये, उपनगरी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांना अशा उपचारांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनजागृती करण्यासाठी पत्रके तयार करण्यात आली आहेत. रुग्णालयांची स्वच्छता करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. (प्रतिनिधी)जे. जे. रुग्णालयात पावसाळी आजारांसाठी औषधांचा पुरेसा साठा महिला आणि पुरुषांसाठी २५ खाटांचे दोन वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत, तर सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात प्रत्येकी २० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. - डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता जे. जे. रुग्णालय उपचारांबाबत डॉक्टरांना प्रशिक्षण रुग्णांना ताटकळावे लागू नये, म्हणून सर्व महापालिका रुग्णालयात तापाचा बाह्यरुग्ण विभाग १३ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालये, उपनगरी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांना अशा उपचारांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनजागृती करण्यासाठी पत्रके तयार करण्यात आली आहेत. रुग्णालयांची स्वच्छता करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
पावसाळ्यासाठी रुग्णालये सज्ज
By admin | Published: June 13, 2016 2:22 AM