हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, हॉस्टेलमध्येही ऑर्डर स्वीकारण्यासाठी गेटवर जाण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 02:10 PM2024-08-18T14:10:23+5:302024-08-18T14:10:53+5:30

महापालिका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंड्राडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

Hospitals now instruct food delivery boys to go to gates to accept orders even in no-entry hostels | हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, हॉस्टेलमध्येही ऑर्डर स्वीकारण्यासाठी गेटवर जाण्याच्या सूचना

हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, हॉस्टेलमध्येही ऑर्डर स्वीकारण्यासाठी गेटवर जाण्याच्या सूचना

मुंबई : निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजत असताना महापालिका प्रशासनाने  रुग्णालयात कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. यावेळी रुग्णालयात आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला प्रवेशबंदी करावी, अशी सूचना देण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांसह कोणीही हॉस्पिटल व कॉलेजच्या आवाराबाहेरून खाद्यपदार्थांची ऑर्डर केल्यास ते आता मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावे लागणार आहे.

महापालिका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंड्राडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यावेळी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि मुख्य सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रुग्णालयातील असुरक्षित जागा शोधून काढणे, संभाव्य ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज निश्चित करणे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 

डिलिव्हरी बॅाय थेट ऑपरेशन थिएटरमध्ये 
अनेक डॉक्टर रुग्णालयात आणि वसतिगृहात असताना बाहेरून जेवण व खायला मागवतात. त्याचा डिलिव्हरी बॉय थेट रुग्णालय व वसतिगृहात किंवा डॉक्टर ज्या वार्ड किंवा  ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन जेवणाची ऑर्डर देत होते. सुरक्षेच्या दृष्टीने हे धोक्याचे असल्याचे लक्षात त्यावर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.

पार्किंगवर लक्ष 
अनेकवेळा रुग्णालयाच्या पार्किंमध्ये डॉक्टरांची वाहने सोडून बाहेरच्या गाड्या उभ्या राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या वाहनांना  नव्याने स्टिकर देण्यात येऊन अन्य वाहनांची गर्दी होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

रुग्णालयात वाजणार बेल 
महापालिकेचे सार्वजनिक रुग्णालय असल्यामुळे अनेकदा एका रुग्णाबरोबर अनेक नातेवाईक त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याकरिता रुग्णालयात व्हिजिटर पासची सोय करण्यात येणार आहे. तसेच रुग्णाला भेटीची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्याप्रमाणे पूर्वीसारखी नातेवाइकांची रुग्णाबरोबर भेटीची वेळ संपल्यानंतर रुग्णालयात विशिष्ट वेळेत बेल वाजविली जाणार आहे. या बेलनंतर सर्व नातेवाइकांनी वॉर्डमधून रुग्णालयाच्या बाहेर जाण्यास सूचित केले जाईल. या करिता सुरक्षा रक्षक सर्व वॉर्डमध्ये फेरी मारणार आहेत.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील सुरक्षेच्या दृष्टीने आता काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णालयात सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. मात्र जेथे त्यांची गरज राहिलेली नाही, त्या अतिरिक्त सुरक्षा रक्षकांना आता ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे नियुक्त केले जाणार आहे. तसेच रुग्णालयात अतिरिक्त गर्दी कशी कमी करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे.  
- डॉ. नीलम अंड्राडे, 
संचालिका, महापालिका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Hospitals now instruct food delivery boys to go to gates to accept orders even in no-entry hostels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.