दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:05 AM2023-09-07T08:05:11+5:302023-09-07T08:05:53+5:30

१६ उपनगरीय रुग्णालयातही १०५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत.

Hospitals on 'alert' mode for Dahi Handi festival; More than 125 ambulances ready | दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

googlenewsNext

मुंबई :  शहरात दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दहीहंडीमध्ये गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, हे लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सर्व रुग्णालयातील १२५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई शहर भागासह पूर्व व पश्चिम उपनगरांत हा दिवस ऐतिहासिक ठरावा, यासाठी विविध गोविंदा पथक आणि संबंधित यंत्रणा अथक प्रयत्न करीत असतात. रुग्णालयात तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून महानगरपालिकेने विशेष नियोजन केले आहे. महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात १०, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात ०७ रुग्णवाहिका  आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ रुग्णवाहिका  आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दीर्घकाळ उपचार देणार

१६ उपनगरीय रुग्णालयातही १०५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. या व्यवस्थेअंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात येते, तर गंभीर जखमी आणि दीर्घकाळ उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जिकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष राहावे, अशा सूचनाही महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.

Web Title: Hospitals on 'alert' mode for Dahi Handi festival; More than 125 ambulances ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.