यजमान मुंबईचे एकहाती वर्चस्व

By Admin | Published: May 12, 2016 02:59 AM2016-05-12T02:59:43+5:302016-05-12T02:59:43+5:30

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापौर चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत, यजमान मुंबईने पुरुष व महिला गटात अनुक्रमे ३८ व ३९ गुणांसह एकहाती वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदावर कब्जा केला

Hostgator Mumbai's perennial domination | यजमान मुंबईचे एकहाती वर्चस्व

यजमान मुंबईचे एकहाती वर्चस्व

googlenewsNext

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापौर चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत, यजमान मुंबईने पुरुष व महिला गटात अनुक्रमे ३८ व ३९ गुणांसह एकहाती वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदावर कब्जा केला, तसेच प्रणित शिंदे व जयवंती देशमुख या ठाणेकरांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टर किताब पटकावताना ठाण्याची छाप पाडली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बृहन्मुंबई वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विलेपार्ले येथील प्रबोधन ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने ३१ गुणांसह पुरुष ज्युनिअर गटात वर्चस्व राखले. नवी मुंबईच्या दिग्विजय सिंग राठोडने दमदार कामगिरी करत बेस्ट लिफ्टरचा मान मिळवला. दिग्विजयने ६९ किलो वजनी गटात एकूण २११ किलो भार उचलून जबरदस्त वर्चस्व राखले.
महिलांमध्ये एकूण ७ वजनी गटात विजेतेपदाची चुरस रंगली. यामध्ये ठाण्याच्या जयवंतीने ४८ किलो वजनी गटात १२७ किलो वजन उचलून बेस्ट लिफ्टरचा किताबही पटकावला, तर योगिता बागुल (५३ किलो), शिवानी मोरे (५८), विनया माने (६३), माधवी साळुंके (७५) आणि आश्लेषा मसवकर (७५हून अधिक) यांनी आपापल्या गटात बाजी मारली. मुंबई उपनगरच्या अंकिता तुकुलने ६९ किलोवजनी गटात वर्चस्व राखले. (क्रीडा
प्रतिनिधी)
पुरुष व महिला गटात मात्र, मुंबईकरांचा एकहाती दबदबा राहिला. एकूण ८ वजनी गटात झालेल्या पुरुषांच्या स्पर्धेत अक्षय पांड्ये (५६ किलो), प्रतिक कदम (६२), अजय शेख (६९), विकास महाजन (८५) आणि इंद्रजीत मोहिते (१०५) या मुंबईकरांनी आपापल्या वजनी गटात अव्वल स्थान पटकावले. ९४ किलो व १०५ हून अधिक किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या अनुक्रमे राहुल यादव व योगेश भोसले यांनी वर्चस्व राखले, तर ७७ किलो वजनी गटात बेस्ट लिफ्टर ठरलेल्या ठाण्याच्या प्रणित शिंदेने २५३ किलो वजन उचलून बाजी मारली.

Web Title: Hostgator Mumbai's perennial domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.