प्रदूषणाचा हॉट स्पॉट - गोवंडी : मास्क घालूनच घराबाहेर पडावे लागते !

By सचिन लुंगसे | Published: October 27, 2023 06:43 PM2023-10-27T18:43:01+5:302023-10-27T18:43:19+5:30

महापालिकेच्या एम ईस्ट वॉर्डमध्ये गोवंडी परिसर येतो.

Hot spot of pollution - Govandi: You have to go out of the house wearing a mask! | प्रदूषणाचा हॉट स्पॉट - गोवंडी : मास्क घालूनच घराबाहेर पडावे लागते !

प्रदूषणाचा हॉट स्पॉट - गोवंडी : मास्क घालूनच घराबाहेर पडावे लागते !

मुंबई : दक्षिण-मध्य मुंबईलाप्रदूषणाचा वेढा पडला असतानाच दुसरीकडे डम्पिंग ग्राऊंडलगत वसलेल्या गोवंडीकरांचा वाढत्या प्रदूषणाने जीव नकोसा केला आहे. डम्पिंगमुळे होणा-या प्रदूषणासह धूळ, धूर आणि धूक्यामुळे घोंगविणा-या धूरक्याने गोवंडीकरांचे पुरते हाल झाले आहेत. दूर्देव म्हणजे जैववैद्यकीय कचरा प्रकल्पामुळे होणा-या हानीवर उपाय योजना करण्याबाबत महापालिका उदासीन असल्याने आमच्या जीवाला काहीच किंमत नाही का ? असा सवाल करत येथे एवढे जीवघेणे प्रदूषण आहे की मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडताच येत नसल्याचे गोवंडीकरांनी सांगितले.

जैववैद्यकीय कचरा प्रकल्पामुळे होणा-या प्रदूषणासह डम्पिंगमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत आम्ही सातत्याने म्हणणे मांडले आहे. मात्र राजकीय प्रतिनिधींपासून प्रशासकीय स्तरावर आमचे म्हणणे नीट ऐकून घेतले जात नाही. आणि ऐकले तरी तोडगा काढण्यावर भर दिला जात नाही ही आमची खंत आहे.
- फय्याज आलम शेख, संस्थापक, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी

गोवंडीत महापालिकेने प्रदूषणाची मोजदाद करणारी यंत्रणा बसविली असली तरी त्याद्वारे प्रदूषणाचे खरे आकडे समोर येत नसल्याचे गोवंडीकरांचे म्हणणे आहे.

गोवंडीमध्ये मोजले जाणारे प्रदूषण महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड होणे गरजेचे आहे. पब्लिक डोमेनमध्ये, डॅशबोर्डवर प्रदूषणाचे आकडे दिसले पाहिजेत. मात्र महापालिका याबाबत ठोस उपाय योजना करत नाही.

गोवंडी येथील प्रदूषणाविरोधात फय्याज आलम शेख हे सातत्याने लढा देत आहेत. महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसपासून मुख्यालयापर्यंत त्यांनी आपला आवाज उठविला आहे. माहिती अधिकाराखाली शेख यांनी मागविलेल्या माहितीद्वारे मृत्यूची आकडेवारी प्राप्त झाली आहे.

- महापालिकेच्या एम ईस्ट वॉर्डमध्ये गोवंडी परिसर येतो.
- गोवंडी परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठे डम्पिंग ग्राऊंड आहे.
- अस्थामुळे होणा-या १०० पैकी ९ मृत्यू हे गोवंडी परिसरातील आहेत.

अस्थमामुळे कोणत्या वर्षी किती झाले मृत्यू
वर्ष / एम ईस्ट / मुंबई / एम ईस्ट टक्क्यांत
२०१६ / ८५ / १०८० / ७.८०
२०१७ / १०२ / ११३२ / ९
२०१८ / १२५ / ११८१ / १०.५८
२०१९ / ९९ / ११३४ / ८.७०
२०२० / ९७ / ११२६ / ८.६०
२०२१ / १११ / ११०४ / १०.०५
एकूण / ६१९ / ६७७५ / ९.१६

Web Title: Hot spot of pollution - Govandi: You have to go out of the house wearing a mask!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.