मुंबई : प्रत्येक वर्षीचा ऊन्हाळा काहीना काही रेकॉर्ड नोंदवित असतो. त्याच प्रमाणे २०२० सालच्या ऊन्हाळ्यात सुरुवातीलाच नोंदविण्यात येत असलेल्या कमाल तापमानाच्या कमालीच्या पा-यामुळे २०२० हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊन्हाच्या सुरुवातीपासून राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरामधील कमाल तापमानाने चांगलीच उसळी घेतली असून, हे कमाल तापमान ४२ अंशावर जाऊन ठेपले आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात येत असली तरी देखील येथील कमाल तापमान आणि आर्द्रता या घटकांमुळे मुंबईकरांना घाम फुटला असून, उत्तरोत्तर यात वाढच होणार आहे.स्कायमेटकडील नोंदीनुसार, २०२० या वर्षाची सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद होईल, अशी चर्चा हवामान अभ्यासकांमध्ये रंगली आहे. आतापर्यंत २०१६ हे वर्ष पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदविण्यात आले आहे. म्हणजेच ४ वर्षापूर्वी जेवढी उष्णता वाढली होती; तेवढी उष्णता २०१६ सालापूर्वी आणि नंतरदेखील नोंदविण्यात आली नाही. २०१६ साली अल-नीनो असित्त्वात होता. परिणामी २०१६ साली वाढलेल्या उष्णतेचे एक कारण अल-नीनोदेखील मानले जात होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०२० साली अल-नीनो अस्तित्त्वात नसल्याचे म्हटले जात आहे. आणि तरीदेखील हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद होण्याच्या मार्गावर आहे. नॅशनल सेंटर फॉर एन्व्हार्यमेंटल इन्फॉर्मेशनच्या एका अहवालानुसार, इतिहासातील नोंदीनुसार, १९८० नंतर आतापर्यंत यावेळेचा मार्च महिना सर्वाधिक उष्ण होता. या अहवाला व्यतीरिक्त नास आणि जपानच्या हवामान विज्ञान संस्थेच्या म्हणण्यानुसार, संपुर्ण इतिहासात २०२० सालचा मार्च महिना सर्वाधिक उष्ण राहिलेला आहे. २०१६ ते २०२० अशी तुलना केली असता २०१५ च्या शेवटपासून २०१६ च्या सुरुवातीपर्यंत अल नीनो सशक्त होता. अल नीनोमुळे भूमध्य रेषेजवळ प्रशांत महासागरातील तापमानही उष्ण होत होत. हीच उष्णता, तापमान वायूमंडळात प्रवेश केल्यानंतर त्याचा प्रभाव म्हणून उष्णतेमध्ये वाढ नोंदविण्यात येत असल्याचे निरिक्षण करण्यात आले. परिणामी जेव्हा जेव्हा अल-नीनो अस्तित्त्वात असतो; तेव्हा तेव्हा उष्णतेमध्ये वाढ नोंदविण्यात येते, असा निष्कर्ष काढला जातो. मात्र यावर्षी अल-नीनोची नोंद नसतानाही मार्च महिन्याची नोंद उष्ण म्हणून झाली आहे.------------------------------
- कार्बन डायआॅक्साइडचे उत्सर्जन हे प्रदूषणासह जागतिक तापमान वाढीस कारणी•ाूत मानले जाते.
- आता कोरोनाला थोपविण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
- जगभरातील सर्व व्यवहार, जनजीवन ठप्प झाले आहे.
- कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.
- तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या कार्बन उत्सर्जनाची भूमिका लॉक डाऊनमुळे कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात असला तरी हे अंतर किती कमी होईल? याबाबत ठोस निष्कर्ष काढण्यात आलेले नाहीत.
------------------------------
कमाल तापमानाची नोंद
स्थान राज्य कमाल तापमानकांडला गुजरात ४२.६अकोला महाराष्ट्र ४२गुलबर्ग कर्नाटक ४२पर•ाणी महाराष्ट्र ४१.९कुरनूल आंध्रप्रदेश ४१.८निजामाबाद तेलंगाना ४१.८सुरेंद्रनगर गुजरात ४१.८जळगाव महाराष्ट्र ४१.६अमरेली गुजरात ४१.५राजकोट गुजरात ४१.५