देशभरातील हॉटेल, मॉल उद्यापासून होणार सुरू, मंदिरांचेही प्रवेशद्वार उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:19 AM2020-06-07T04:19:26+5:302020-06-07T04:19:58+5:30
मंदिरे दर्शनास खुली होणार । तीर्थ-प्रसाद देण्यास मात्र बंदी; हॉटेलांमध्येही शक्यतो ‘पार्सल’ सेवा
नवी दिल्ली : गेले अडीच महिने बंद असलेली देशभरातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे येत्या आठवड्यापासून दर्शनासाठी खुली करण्यास मुभा मिळणार असली तरी त्याठिकाणी कोणालाही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू न देण्याचे व भाविकांना तीर्थ-प्रसाद वाटण्यास केंद्र सरकारने बंदी केली आहे.
सोमवारपासून (८ जून) मंदिरे, प्रार्थनास्थळे, उपाहारगृहे, हॉटेल्स व मॉल पुन्हा सुरू करताना कोणत्या गोष्टींना प्रतिबंध असेल व इतर गोष्टी करताना कोणती काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्र्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्या आहेत. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारापाशी ‘हँड सॅनिटायझर’ ठेवणे, योग्य अंतर ठेवून लोकांनी रांग कुठे लावावी याच्या खुणा आखणे व ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींनाच प्रवेश देणे ही बंधने पाळावी लागतील.
मंदिरे व प्रार्थनास्थळे
च्पादत्राणे वाहनातच काढून ठेवावी.
च्आत येण्यापूर्वी प्रत्येकाने हात-पाय धुणे बंधनकारक.
च्देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई.
च्तीर्थ-प्रसाद वाटण्यास व पवित्र जल शिंपडण्यास मनाई.
च्प्रत्येकाने बसण्यासाठी आपापली सतरंजी अथवा आसन आणावे.
च्अनेकांनी एकत्र जमून भजने, आरत्या म्हणण्यास मनाई.
च्त्याऐवजी भक्तिगीतांच्या रेकॉर्ड लावाव्या.
शॉपिंग मॉल
च्मॉलमधील एसीचे २४ ते ३० अंश व हवेची आर्द्रता ४० ते ७० टक्के असावी.
च्मॉलमधील चित्रपटगृहे बंद राहतील.
च्बाहेर मुलांसाठी खेळण्याची साधने असतील तर तीही बंद ठेवावी.
च्ग्राहकांनी आतमध्ये फिरताना व पैसे देण्याच्या रांगेत किमान तीन फुटांचे अंतर ठेवावे.
च्पसंत केलेले कपडे मापाचे आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी ‘ट्रायल रूम’मध्ये ते घालून बघण्यास मनाई.
उपाहारगृहे व हॉटेल
च्ग्राहकांना तेथे बसून खाण्याऐवजी शक्यतो ‘पार्सल’ सेवा द्यावी.
च्तेथे बसून खाणाऱ्यांना पाहून/वापरून झाले की फेकून देता येईल असे मेन्युकार्ड व नॅपकिन द्यावे.
च्हॉटेलांनी गेस्टना आवश्यक फॉर्म आॅनलाईन भरण्यास सांगावे.
च्स्पर्शविरहित चेक-इन व चेक-आऊटची सोय करावी.
च्गेस्टचे जास्तीचे सामान लॉकरूममध्ये ठेवण्याआधी त्याचे निर्जंतुकीकरण करावे.
च्हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी गेस्टशी शक्यतो मोबाईल किंवा इंटरकॉमवरच बोलावे.
च्रूम सर्व्हिस देतानाही किमान अंतर राखून सेवा द्यावी.