सरकारच्या परवानगीने  हाॅटेल्स उघडले; खवय्ये घरातच, अद्यापही भीती कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 07:30 AM2020-11-05T07:30:20+5:302020-11-05T07:30:58+5:30

Hotels : कामगारांना अभावी अनेक रेस्टॉरंट सुरू करता येणार नाहीत. तर काही जणांना मालकाशी रेस्टॉरंटचा थकलेल्या भाड्याबाबत तडजोड झाली तरच त्यांना सुरू करता आले नाही.अजूनही ४० रेस्टोरंट बंदच आहेत.

Hotels opened with government permission; Eat at home, still scared | सरकारच्या परवानगीने  हाॅटेल्स उघडले; खवय्ये घरातच, अद्यापही भीती कायम

सरकारच्या परवानगीने  हाॅटेल्स उघडले; खवय्ये घरातच, अद्यापही भीती कायम

Next

मुंबई : हॉटेल आणि रेस्टोरंटमध्ये जेवणासाठी परवानगी देऊन महिना उलटला आहे. अद्यापही लोकांमध्ये भीती कायम असून खवय्ये घरातच आहेत. हॉटेलला १०तर रेस्टोरंटला ३५ टक्के प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत शिवानंद शेट्टी म्हणाले की,  जुलै पासून हॉटेल तर ऑक्टोबर पासून रेस्टोरंट आणि बार सुरू करण्यात येणार आले आहेत. ऑक्टोबरपासून हॉटेलमध्ये बसून जेवणाची परवानगी देण्यात आली आहे. पण कर्मचारी उपलब्ध नाहीत. हॉटेल कामगारांमध्ये स्थलांतरीत कामगारांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कामगारांना अभावी अनेक रेस्टॉरंट सुरू करता येणार नाहीत. तर काही जणांना मालकाशी रेस्टॉरंटचा थकलेल्या भाड्याबाबत तडजोड झाली तरच त्यांना सुरू करता आले नाही.अजूनही ४० रेस्टोरंट बंदच आहेत.
तर हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्षिश सिंग कोहली म्हणाले की, रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे पर्यटक येत नाहीत. अद्यापही हॉटेल चालकांना कमी प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊन काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी  राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. त्याबाबत जाहिराती करून हॉटेलमध्ये काळजी घेतात हे सांगितले पाहिजे.तरच  लोकांचा विश्वास वाढेल.

हॉटेलमध्ये कशी काळजी घेतली जाते
हॉटेलमध्ये येताना गेटवर दोनवेळा स्क्रिनिंग आणि निर्जंतुकीकरण करण केले जाते.ग्राहकाच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाते. पेमेंट ऑनलाईन करण्यात येते त्यामुळे संपर्क टाळता येतो. त्यानंतर ग्राहकाला हॉटेलमध्ये प्रवेश दिला जातो. ग्राहकांना जेवण देताना युस ऍण्ड थ्रो प्लेटमध्ये जेवण दिले जाते.

हॉटेलमध्ये खाणाऱ्यामध्ये मुंबई बाहेरील ग्राहकांचा जास्त समावेश होता. लोकल चालू होत नाही तो पर्यंत हॉटेल पूर्णपणे होणार नाही.
- राकेश शेट्टी,  हॉटेल व्यावसायिक

आम्ही निर्जंतुकीकरण करतो,मास्क वापरतो, स्वच्छता ठेवतो पण तरीही ग्राहक कमी येत आहेत. आम्ही शक्य ती काळजी घेतो
- सतीश नायक, हॉटेल व्यावसायिक

 लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, दिवाळीत आणखी चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे
    - ध्रुवीर गांधी, हॉटेल व्यावसायिक

Web Title: Hotels opened with government permission; Eat at home, still scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.