दगडखाणींमुळे घरांना तडे

By Admin | Published: April 16, 2015 10:44 PM2015-04-16T22:44:59+5:302015-04-16T22:44:59+5:30

पडघे परिसरातील असलेल्या दगडखाणीमुळे बाजूला असलेल्या हेदुटणे आदिवासींना त्रास होत आहे. ब्लास्टिंगमुळे येथील घरांच्या भिंती, पत्र्यांना तडे गेले असून धुळीमुळे आदिवासी त्रस्त आहेत.

House cracks due to stones | दगडखाणींमुळे घरांना तडे

दगडखाणींमुळे घरांना तडे

googlenewsNext

प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
पडघे परिसरातील असलेल्या दगडखाणीमुळे बाजूला असलेल्या हेदुटणे आदिवासींना त्रास होत आहे. ब्लास्टिंगमुळे येथील घरांच्या भिंती, पत्र्यांना तडे गेले असून धुळीमुळे आदिवासी त्रस्त आहेत. यासंदर्भात आदिवासींनी तहसीलदारांना निवेदन दिले असून या खाणींतील काम बंद करण्याची मागणी केली आहे.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आणि पाडे आहे. त्यामधील हेदुटणे वाडी ही एक असून या ठिकाणी जवळपास दोनशे घरे आहेत. या वाडीत जवळपास एक हजार लोकवस्ती आहे. या गावाजवळ जवळपास पाच दगडखाणी आहेत. मशिनच्या सहाय्याने डोंगर पोखरण्याचे काम रात्र दिवस सुरू आहे. त्यामुळे आदिवासींच्या घरांना तडे गेले आहेत. शिवाय मशिनच्या आवाजानेही ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
दगड काढण्याकरिता याठिकाणी ब्लास्टिंग केले जाते त्यामुळे दगड उडून हेदुटणे वाडीत येतात. त्यामुळे जमीन हादरल्याने घरांच्या भिंती त्याचबरोबर पत्रे, कौलांना सुध्दा तडे गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ब्लास्टिंग करताना पूर्वकल्पना दिली जात नाही. त्यामुळे येथील आदिवासींना जीव मुठीत धरून रहावे लागते. दगडखाणीतून बाहेर पडणाऱ्या धुळीचाही आदिवासींनी त्रास होतो. त्यामुळे श्वसन, खोकला त्याचबरोबर त्वचेच्या विकाराने अनेकजण ग्रासले आहे. या धुळीचा वनशेतीवर परिणाम होत असून त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यतिरिक्त खाणीमुळे डोंगरावरील व जवळची वनराई जवळपास नष्ट होत आली आहे. या खाणीतून दगड, खडी, कच नेण्याकरिता मोठ्या प्रमाणात वाहने येत असून हेदुटणेतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

४ २००७ साली या दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासींंनी तहसीलदारांना अर्ज दिला होता. त्यानुसार खाणी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र एक दीड वर्षाने त्या पुन्हा सुरू झाल्या. या खाणी बंद करून गावात शांतता प्रस्थापित करून द्यावी, अशी मागणी येथील आदिवासींनी महसूल विभागाकडे केली आहे.

हेदुटणे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांनी आमच्याकडे दगडखाणीबाबत तक्र ारी अर्ज केला आहे. याबाबत वस्तुस्थिती काय आहे याची पडताळणी आम्ही करू, जर येथील कुटुंबाला त्याचा त्रास होत असेल तर दगडखाणीवर नक्कीच कारवाई करण्यात येईल
- पवन चांडक,
तहसीलदार, पनवेल

Web Title: House cracks due to stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.