कुलभूषणचे पनवेलमध्ये घर
By admin | Published: March 30, 2016 01:31 AM2016-03-30T01:31:32+5:302016-03-30T03:58:40+5:30
पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण जाधव याच्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता असल्याचे उघड झाले आहे. पनवेलमधील तक्का येथील
पनवेल : पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण जाधव याच्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता असल्याचे उघड झाले आहे. पनवेलमधील तक्का येथील (जसदानवाला कॉम्प्लेक्स) हायपॉइंट को.हौ.सो.मध्ये तो हुसेन मुबारक या नावाने राहत होता. पनवेलमधील फ्लॅट कुलभूषणची आई अवंती जाधव यांच्या नावावर आहे. त्यांचे वडील सुधीर जाधव निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.
२५ वर्षांपूर्वी त्यांनी पनवेलमध्ये हे घर खरेदी केल्याचे बोलले जात आहे. कुलभूषण हुसेन मुबारक पटेल या नावाने राहत होता. १२ मे २०१४ ला ठाणे पासपोर्ट कार्यालयातून बनविण्यात आलेल्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता दिला होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून कुलभूषण याठिकाणी आला नाही. २०१४ मध्ये कुलभूषणला याठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी पाहिलं होतं. मराठी, हिंदीत संवाद साधणारा कुलभूषण २०१० पर्यंत अधूनमधून येत असल्याची माहिती रहिवासी जे. बी. भोईर यांनी दिली.
कोण आहे कुलभूषण जाधव?
पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषणने नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. जाधव याचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे. त्याला पाकिस्तानने बलुचिस्थान येथून अटक केली आहे.