मुंबई : मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला. त्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत मुंबईत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची योजना आणण्यात आली. मात्र, केंद्राच्या धर्तीवर सुरू असलेल्या या योजनेंतर्गत आलेल्या तब्बल दोन हजार ६८४ अर्जांना महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे.
जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात एकीकडे उत्तुंग इमारती असताना आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी कुटुंबे मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. सार्वजनिक शौचालयांअभावी रेल्वे रुळांवरच प्रात:विधी उरकण्याचे प्रमाण मुंबईत अधिक होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर घरोघरी शौचालय योजना तीन वर्षांपूर्वी जाहीर झाली. योजनेंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी पाच हजार रुपये मदत मिळणार होती. त्यानुसार महापालिकेकडे घरात शौचालय बांधण्यासाठी १९ हजार ८९३ अर्ज आले होते. मात्र, महापालिकेच्या अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या अर्जांना नकार देण्यात आला आहे. असे तब्बल दोन हजार ६८४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. निकषांची पूर्तता न करणाºया अर्जांना नाकारण्यात आले असल्याचे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.
पाच हजारांची मदतच्स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार महापालिकेने मुंबईतील सुमारे ७४० झोपडपट्ट्यांना या योजनेचा लाभ देण्याची तयारी दाखविली. च्मुंबईतील सुमारे ६० लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. या योजनेंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी पाच हजार रुपये मदत मिळणार होती.19893अर्ज आले6000000लोक झोपडपट्टीत राहतात