रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून पेटवले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:13+5:302021-05-05T04:08:13+5:30
पवईतील घटना, गुन्हा दाखल रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून पेटवले घर पवईतील घटना; गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
पवईतील घटना, गुन्हा दाखल
रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून पेटवले घर
पवईतील घटना; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून पवईतील ४३ वर्षीय व्यक्तीचे घर पेटवल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
पवई येथील फिल्टरपाडा परिसरात ४३ वर्षीय तक्रारदार राहताे. ताे अभिलेखावरील आरोपी असून पवई, साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ५ ते ६ गुन्ह्यांची नोंद आहे. तो वर्षभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला असून सध्या टेम्पोचालक म्हणून काम करताे. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तो राहत असलेल्या भागातील दाऊद अख्तर शेख (वय २८) व सद्दाम गुलाम शेेेख (२६) हे दोघेही रिक्षाचालक आहेत. २७ जानेवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास औषधाेपचार करण्यासाठी कूपर रुग्णालयात गेला असता दाऊदची रिक्षा चोरीला गेली. ती रिक्षा मीच चोरी केल्याचा आरोप करत त्याने भांडण सुरू केले.
रविवारी दुपारच्या सुमारास आरे कॉलनी परिसरात असताना दाऊद आणि सद्दाम यांनी घरात घुसून घरातील गृहोपयोगी वस्तू, कपडे, चादरी व गाद्यांना आग लावून घर पेटवले. याबाबत बहिणीकडून समजताच तक्रारदाराने घर गाठले. तोपर्यंत शेजारच्यांंनी आग विझवली. याप्रकरणी त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पाेलीस अधिक तपास करत आहेत.
..........................