माजी सैनिकांना आवास योजनेतून घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:28 AM2020-01-08T05:28:19+5:302020-01-08T05:28:27+5:30
राज्यातील माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी प्राधान्य द्यावे.
मुंबई : राज्यातील माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे
देण्यासाठी प्राधान्य द्यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी केली. विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात बसणा-या जवानांच्या कुटुंबियांना घर देण्याबाबत प्राधान्य देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील आजी-माजी सैनिकांच्या घरांना घरपट्टीतून सूट द्यावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असून वित्त विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवावा. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी चर्चा करु, असे भुसे
यांनी सांगितले.
सैनिकाची पत्नी शासकीय सेवेत असेल तर त्यांना घराजवळ किंवा इच्छित ठिकाणी बदली देण्याचे धोरण तयार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.