ऑक्टोबरात सिलिंडरची गृहिणींना मिळतेय साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:13 AM2023-10-16T09:13:43+5:302023-10-16T09:14:05+5:30

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींची बचत होत असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Housewives are getting gas cylinders in cheaper October | ऑक्टोबरात सिलिंडरची गृहिणींना मिळतेय साथ

ऑक्टोबरात सिलिंडरची गृहिणींना मिळतेय साथ

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने सिलिंडरचे दर नुकतेच कमी केले आहेत. मुंबईत ११०० रुपयांचा एलपीजी सिलेंडर गॅस ९०० रुपयांना मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींची बचत होत असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यातच ऑक्टोबरमधील हीट पाहता गॅसचा वापर कमी होत आहे.

सिलिंडरची मागणी झाली कमी 
  एचपी, भारत, इंडेन अशा विविध कंपन्यांचे एलपीजी सिलिंडर मुंबईत विकले जातात. मुंबईत मिळणारा ११०० रुपयांचा सिलिंडर ९०० रुपयांना मिळत आहे. 
  ऑक्टोबर हीटमुळे सिलिंडरची मागणी कमी असल्याचे गॅस एजन्सी येथे काम करणाऱ्या तिवारी यांनी सांगितले.

एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणावर 
  चमचमीत स्वयंपाक करण्यासाठी गृहिणी एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. 
 गेल्या काही वर्षांत गॅसच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढल्या होत्या. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट आपसूकच वाढले होते. 
 पण, एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला. १४ किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये २०० रुपये प्रति सिलिंडरची कपात सरकारने केली असून उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीचे दरही कमी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतला.

उष्णतेमुळे कमी वापर

 परिणाम स्वयंपाकघरावर देखील झाला आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे जेवण शिजवण्यासाठी गॅस कमी लागत आहे. 
 पाणी तापवण्यासाठी गॅस जास्त लागतो, मात्र आता उष्णतेमुळे थंड पाण्याने अनेक घरांत स्नान केले जाते त्यामुळे गॅसमध्ये बचत होत आहे.
 

Web Title: Housewives are getting gas cylinders in cheaper October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.