मुंबई : उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासातून म्हाडाला अतिरिक्त क्षेत्रफळाच्या माध्यमातून घरे न देणा:या 33 बिल्डारांविरुद्ध वसुलीची ठोस कारवाई करण्यात येणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे मुंबई इमारत पुनर्रचना व दुरुस्ती मंडळाचे मुख्याधिकारी डॉ़ रामास्वामी यांनी सांगितले.
गुन्हा दाखल केल्यानंतरही या बिल्डरांना अतिरिक्त घरे किंवा दंड भरण्यासाठी सवलत देण्यात आलेली होती, मात्र आतार्पयत केवळ दोघांनी घरे दिलेली आहेत.
जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला उपलब्ध होणारे अतिरिक्त क्षेत्रफळ (तयार घरे ) ही म्हाडाला न देताच परस्पर 33 बिल्डरांनी विकल्याचा अतिरिक्त क्षेत्रफळ घोटाळा उघडकीस
आला.
उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास योजनेनुसार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून उपलब्ध होणारे अतिरिक्त क्षेत्रफळ (घरे ) बिल्डरांनी पुनर्रचित इमारतीत न देता त्याच वार्डात इतरत कुठेही द्यावीत, अशी नियमात तरतूद आहे.
नेमका याच नियमाचा फायदा घेत बिल्डरांनी तयार केलेल्या पुनर्रचित इमारतीत म्हाडाला घरे न देता त्याच वार्डात देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. पुनर्रचित इमारतीतील घरे विकून कोटय़वधींची कमाई केली
आहे. (प्रतिनिधी)