गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी; म्हाडाची २ हजार ५२१ घरे उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:04 PM2023-08-03T13:04:52+5:302023-08-03T13:05:22+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उपलब्ध २ हजार ५२१ घरांसाठी म्हाडाकडून ५८ गिरण्यांमधील शिल्लक गिरणी कामगार/वारसांकरिता प्रस्तावित सोडतीमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

housing lottery for mill workers; 2 thousand 521 houses available in Mhada | गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी; म्हाडाची २ हजार ५२१ घरे उपलब्ध

गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी; म्हाडाची २ हजार ५२१ घरे उपलब्ध

googlenewsNext

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील बंद, आजारी अशा ५८ गिरण्यांमधील गिरणी कामगारांच्या घरांकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हाडाला उपलब्ध झालेल्या २ हजार ५२१ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. 

म्हाडाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव दुरुस्ती, गिरणी संकेत क्रमांक दुरुस्ती, एकापेक्षा जास्त अर्जांपैकी एक अर्ज ग्राह्य धरून उर्वरित अर्ज रद्द करणे इत्यादी बाबींकरिता विनंती अर्ज सादर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या शिबिरांत १९ डिसेंबर २०२२ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्राप्त विनंती अर्जावर कार्यवाही करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उपलब्ध २ हजार ५२१ घरांसाठी म्हाडाकडून ५८ गिरण्यांमधील शिल्लक गिरणी कामगार/वारसांकरिता प्रस्तावित सोडतीमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कुठे, किती आहेत घरे
ठिकाण / घरे / क्षेत्रफळ
१) टाटा हाऊसिंग, रांजनोळी, ठाणे /१२४४ /३२० चौ.फूट 
२) विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, रायगड /१०१९/३२० चौ.फूट 
३) सान्वो व्हिलेज, कोल्हे, पनवेल, रायगड /२५८ /३२० चौ.फूट
 
Web Title: housing lottery for mill workers; 2 thousand 521 houses available in Mhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.